अहमस्मि योधः भाग - ९

  • 10.7k
  • 1
  • 4k

स्नेहा त्या कागदावरच मजकूर वाचून जागीच गोठल्यागत झाली होती. " अरे यार..स्नेहा आपल्याला थोडा वेळ इथेच थांबावं लागेल इंजिन खूप गरम झालाय..त्यामुळे गाडी स्टार्ट होत नाही.." - समीर म्हणाला. स्नेहाचं काहीच प्रतिउत्तर आलं नाही.. " स्नेहा.... स्नेहा.." - समीर ने पुन्हा आवाज दिला.. त्याने बोनेट लावून घेतला..स्नेहा त्या कागदाकडे निरखून पाहत होती..हे बघून समीर घाबरला.. " स्नेहा काय बघतेस तू..? ठेवून दे ते..काही नाहीये त्यात.." - समीर अडखळत्या स्वरात म्हणाला. "थांब समीर..गेली काही दिवस तुझ्या वागणयातला बदल मला जाणवत आहे..तू असा कधीच नव्हतास..काही प्रॉब्लेम होता तर मला आधीच सांगायचं ना.." - स्नेहा. "तू काय बोलतेस..मला काहीच कळत नाही.." - समीर