To Spy - 5

  • 15.7k
  • 1
  • 7.4k

To Spy भाग ५ "वीर, मी संध्याकाळी पाच वाजता महाबळेश्वरला निघतो." "आजच ?" विराटने आश्र्चर्याने विचारलं. "हो, आधीच उशीर झाला आहे, अजून वेळ लावून चालणार नाही." " हो, बरोबर आहे. मीही येतो तुझ्यासोबत." "नाही वीर, दोघांनी एकाच दिशेने तपास करून कसं चालेल ? तु उद्या त्या पंजवाणींची भेट घे. आणि अशा वेळी तु निधी सोबत असायला हवस." करण त्याला समजावत म्हणाला. "हं." "चल आता निघतो मी." थोड्या वेळानं उठत करण म्हणाला. "दोन वाजलेत. जायची तयारीही करायचीये‌." दोघेही खाली आले. किचनमध्ये निधी आणि रेणुकाबाईंच्या गप्पा रंगात आल्या होत्या. वाटतच नव्हते की ही त्यांची पहिली भेट आहे. दोघीही जुन्या मैत्रीणी असल्यासारख्या बोलत