लगेच विराज बोलतो. "हे बघा तुम्हाला राग येणार नसेल तर एक सजेस्ट करू का?"सगळे एकदम हसु लागतात. विराज त्यांच्याकडे बघतच राहतो. मग हळुच कौस्तुभ म्हणतो. "काय मित्रा? तुला कधी पासुन आमची परवानगी लागु लागली..बोल..बोल" विराज हसत बोलतो. "अरे... तस नाही. काय आहे, ते आता बाहेर सगळं बघितलं न. म्हणल आपण काहीतरी चांगलं सांगायला जाणार आणि परत तेच सगळं होणार त्यापेक्षा आपण आधीच विचारलेलं बर. असो तर प्रोग्रॅम असा आहे की, आता सगळेजण बाहेर जातील मस्त थंडगार वारा सुटला आहे. तेव्हा अंगणात शेकोटी समोर खुर्च्या मांडुन बसुत पण आज नुसतं बसायचं नाहीये तर प्रत्येकांनी एकमेकांबद्दल एक चांगली आणि एक वाईट गोष्ट