कोकणातील रहस्यकथा?

  • 15.6k
  • 1
  • 4.8k

कोकण आणि कोकणातली भुते ही खूपच फेमस!! मला आठवतंय, जेव्हा पण मी सुट्टीत मामाच्या गावाला जायची. आम्ही सगळी भावंडं रातभर बसून एकमेकांना भुतांच्या गोष्टी सांगत असु. प्रत्येक जण त्यांनी ऐकलेले, त्यांनी वाचलेले आणि काहींनी अनुभवलेले ही प्रसंग सांगत असायचे. आम्ही घरातल्या खळ्यात बसून हा कार्यक्रम करत असू. त्यातच आमच्या गोष्टी ऐकुन आजोबा, आजी, तसेच शेजारच्या घरातलं कोणी त्यावेळेला तिथे बसलेलं असेल तर तो व्यक्तीही त्याचे अनुभव सांगत असे. मग भुताच्या गोष्टी खूपच रंगायच्या आणि ऐकताना अजून मजा यायची. असचं एक दिवस आजीने आम्हाला सांगितलेली एक गोष्ट मला चांगली आठवते. ती अशी की, "माझे आजोबा त्याकाळी कामानिमित्त मुबंईत असायचे. तेव्हा आमच