रेशमी नाते - 11

(50)
  • 38.8k
  • 1
  • 24.1k

पिहु सकाळी उठली तर विराट,पालथा झोपला होता. झोपेतच तिच्या जवळ आला होता.त्त्याचा एक हात तिच्या पोटावर होता.‌दररोज सारखी ब्लँकेट त्याची थोडी खाली तर ‌थोडी वर पिहुला स्वतःशीच हसली.कोणाला वाटेल का हे असे झोपतात.... त्या पिलोचा काही़ उपयोगच नाही,सगळ्या अस्थाव्यस्थ झाल्या होत्या??? पिहुने हळुच त्याचा हात काढला....आणि आवरुन बाहेर आली.गॅलेरीत बाऊल मध्ये बर्डसला पाणी ठेवत होती..थोड ढगाळ मधेच सुर्याची कोवळी किरणे डोकावत होती.... विराटला जाग आली..तो डोळे चोळतच गॅलेरीच्या दिशेने बघु लागला.त्याची नजर पिहुवर गेली..कोवळ्या ऊनाची सोनेरी किरणे तिच्यावर पडली होती.त्यात‌ तिच रुप अधिकच खुलुन दिसत होते.नुकतीच अंघोळ केली होती...ओल्या केसामंधुन पाण्याचे थेंब टपटप गळत तिच्या पाठीवर,दंडावर पडत‌ होते...अंगावर एकही दागिना