सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 7

  • 3.4k
  • 1.4k

हळूहळू गर्दी जमा होत होती. परदेशी पाहुणे देखील उत्सुकतेने कॅमेरे घेऊन येत होते. साडेसहा झाले आणि एकसारख्या पोशाखात पाच तरुण आरती करण्यासाठी म्हणून आले. पिवळं पितांबर आणि मरूण रंगाचा कुर्ता घातलेले ते पाचजण आपापल्या जागेवर स्थानापन्न झाले. धुपाचा सुगंध सर्वदूर दरवळत होता. घंटानादाने वातावरणात अतिशय सात्विकता येत होती. पुरोहितांचे मंत्रोच्चारण, सुमधुर संगीत याने भारावून जायला होत होते आणि आपसूकच तोंडातून शब्द बाहेर पडतात – “नमामी गंगे...!!!” प्रथमतः शंखनादाने सुरुवात झाली. एका विशिष्ट सुरात शंखनाद ऐकत असताना कान तृप्त होत होते. नंतर त्वमेव माता, गुरुरब्रम्हा, शिवध्यान, पार्वती ध्यान, गंगा ध्यान, सर्वे