सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 8

  • 4.6k
  • 1.8k

त्यांच्यासोबत UNO खेळायला खूप मजा आली. तब्बल दोन वर्षांनंतर मी UNO खेळत होतो. पुण्याला शिक्षणासाठी असताना रुममेट्स सोबत परीक्षेच्या आदल्या रात्री UNO खेळण्याची मजा काही औरच होती. आमच्या रूममध्ये आमच्या तिघांव्यतिरिक्त अजून एक जण होता. तीशीच्या घरात असेल बहुतेक. तो काहीच बोलला नाही. अंतर्मुख प्रकारचा व्यक्ती असावा बहुतेक. दिवसभर फिरल्यामुळे कमालीचा थकलो होतो त्यामुळे बेडवर आडवं होताच निद्रादेवीच्या आधीन झालो. तिसरा आणि शेवटचा दिवस उजडण्याआधीच मी पाच वाजता उठलो. बाकी मंडळी झोपली होती. साडेपाच वाजता तयार होऊन “सुबह - ए – बनारस” कार्यक्रम बघायला निघालो. सामान्यपणे सकाळी पाच