सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 9

  • 4.8k
  • 1.8k

केदार घाटावरील मंदिर हे काशीच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे असे म्हणतात. त्यामुळे घाटाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. येथे बर्‍यापैकी गर्दी असते. पुढे हरिश्चंद्र घाट आहे. आपल्या सत्य बोलण्यासाठी सम्पूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल्या राजा हरिश्चंद्र यांची कथा याच ठिकाणी घडली असे सांगितले जाते. त्रेता युगातील हरिश्चंद्र हे अयोध्येच्या इश्वांकू वंशीय ३७ वे राजे होते.त्यांच्या कार्यकाळात सुख,शांतता आणि समृद्धी राज्यात नांदत होती. चक्रवर्ती सम्राट सागर हरिश्चंद्राच्या नंतरच्या १३ व्या पिढीतले. त्यनाची कहाणी काही अशी आहे, - एकदा राजा हरिश्चंद्र आपली राणी तारामती आणि मुलगा रोहित सह शिकारीला गेले होते. तुटे त्यांना एका महिलेच्या