सोलो बॅकपॅकिंग इन वाराणसी.... - 10

  • 4.6k
  • 1.9k

इथली पद्धत अशी आहे की आधी श्री मारूतीरायांचे दर्शन घ्यायचे आणि नंतर मंदिरासमोर असलेल्या कोडंडधारी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मातेचे मंदिर आहे, तिथलं दर्शन घ्यायचं. सुमारे अर्ध्या तासाने दर्शन झालं. येथे श्री तुलसीदास स्वामींचा वास असायचा. येथील कंदी पेढे फार प्रसिद्ध आहेत. हे पेढे बघून माला भद्रा मारुतीच्या इथल्या पेढ्यांची आठवण झाली. येथून पुढे मी बनारस हिंदू विद्यापीठाकडे निघालो. गेटकडे जातानाच माहिती मिळाली की अयोध्या प्रकरणी निकाल आपल्या बाजूने लागला आहे. आज सकाळपासूनच नगरात पोलिस बंदोबस्त प्रचंड प्रमाणात वाढवला होता. निकाल लागल्याचे सर्वांना माहीत होते, पण