आणि डाग मिटला...©अपर्णा..... रजौरी भारत पाक बाॅर्डर वर असलेलं , निसर्गाच्या सौंदर्याची उधळण असलेलं जम्मू काश्मिर मधिल एक छोटंसं शहर. आणि या शहराजवळ वसलेलं छोटंसं गाव नौशेरा .सतत चालणार् या दहशती कारवाया आणि दोन्ही बाजूनं होणारे गोळीबार यानं भेदरून गेलेलं निसर्गाची निरव शांतता भंग पावणारं अनेक मृतदेहांचे खच पाहिलेलं गावं. याच छोट्याशा गावात , नदिमला अटक झाल्यापासून तरन्नूम आणि तीचा मुलगा फैजल सततच्या भीतीत दिवस कंठत होते. फैजल चे अब्बू नदिम आणि तरन्नूम या नौशेरातच जन्मलेले. नदिम एक मेंढपाळ होता. मेंढ्यांचं पालन पोषण करून त्यांच्यापासून मिळणारं दुध, लोकर आणि गोष्त याच्यावर