रेशमी नाते - 12

(42)
  • 31.2k
  • 1
  • 20.9k

उशिरा झोपल्यामुळे विराटला सकाळी लेट च जाग आली....आज ऑफिस नव्हते म्हणून तो निवांत आवरून खाली आला. सकाळपासून पिहू दिसलीच नव्हती. मॉम, पिहू कुठे आहे. ती कॉलेजला गेली. तेव्हा त्याच्या लक्षात येते. तो ब्रेकफास्ट करून देवेश बरोबर साईट वर निघून जातो. संध्याकाळी विराट घरी आला. आत आल्या आल्या पिहू चा हसण्याचा आवाज आल्याने विराट चा चेहरा खुलला. सकाळ पासुन बघितल नव्हत तिचा आवाज ऐकला नव्हता तर चुकचुकल्यासारखे वाटत होते. विराट फ्रेश होऊन खाली आला. पिहू सगळ्याबरोबर गप्पा मारत बसली होती .विराट तिच्या जवळ चालला होता की पिहू चा मोबाइल वाजल्याने ती कॉल रिसीव करत बाहेर जाते. विराट ही तिच्या मागे जाणार