सुटका पार्ट 1

  • 16.1k
  • 7.8k

रात्री उशिरापर्यंत मी माझ्या कॅबिन मधे बसून होते. बऱ्याच वेळापासून रात्रीच्या अंधारात भयंकर वाटतील असे भिंतीवर ओरखडून होणारे आवाज थांबले. काही वेळ मी सुटकेचा श्वास घेतला, डॉक्टर असून मी कधी या स्थिती मध्येही असेल असं मला स्वतःला देखील वाटलं नव्हतं, गेल्या दहा दिवसांत मी प्रत्येक क्षणाला मरत होते, त्याचा हसणारा प्रेमळ चेहरा डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहायचा, मी जुन्या आठवणींत रमुन जायची, काही क्षणासाठी झालेली शांतता पुन्हा त्या भयानक आवाजाने ढवळून निघाली, काहीश्या तंद्रीत हरवलेली मी दचकून जागी झाले, पूर्णपणे काटेकोर लक्ष देता यावं म्हणून माझ्या कॅबिन शेजारच्याच वॉर्ड मध्ये त्याला ठेवलं होतं. काहीश्या थरथरत्या हाताने मी त्याच्या खोलीच्या खिडकीतून