सुटका पार्ट 2

  • 10.3k
  • 5.3k

“Hi, मी श्रीयश.” त्याने बत्तीशी दाखवत हात पुढं केला, मला तर काही इंटरेस्ट नव्हता त्याच्या बरोबरं hi, hello करण्यात.मख्ख चेहऱ्याने मी त्याच्या हाताकडे पाहून थंड आवाजात “hello” म्हंटल. त्याने ज्या वेगाने हात पुढे केला होता त्याच वेगाने मागे घेतला.आमचा दहावी ‘क’ चा वर्ग सुरू झाल्या पासून दुसरा महिना होता. हा नवीन आलेला प्राणी सोडला तर वर्गातला प्रत्येक जण आपल्या पासून चार हात लांबच राहायचा. मी प्रकारच तसा होते मला फालतू ची बडबड आवडायची नाही आणि जास्त कोणी बोलण्याचा प्रयत्न केल्यास काय होते हे प्रत्येकाला चांगलेच माहीत होते. म्हणून आपलं चार हात लांब बरं असं म्हणून सगळे मला माझी पब्लिक privacy