एक जुनी पडकी खोली वजा डाक घर तिथं होतं, आत गेल्यावर कुणीतरी काम करताना दिसलं, ती करुकुरणारी खुर्ची त्यावर एक खाकी कपडे घातलेला जक्ख म्हातारा बसलेला होता. चष्म्यातून त्याला फार काही स्पष्टपणे दिसत असेल याची मला जरा शंका वाटली कारण दारात मी उभी असं ताना माझ्या कडे बारीक डोळे करून तो पाहत होता आणि सोबत म्हणत होता. “आला का रे राम्या, बरं झालं. मी का निघतो आता घरला. तू टाळा लावून टाक तेव्हढा.” असं म्हणून तो त्या कुरकुरणार्या खुर्चीतुन उठला. काका मी तुमच्या कडे काम होतं म्हणून आले आहे थोडी माहिती हवी होती, त्या जड भिंगाच्या चष्म्यातून त्याने पुन्हा एकदा