सुटका पार्ट 9

  • 8.1k
  • 1
  • 3.6k

बाकीच्या कायम बंद असतात म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही. तेवढ्या दोन मिनिटाच्या कालावधीत डोक्यात काय काय विचार येऊन गेले असं तील? अंगाला हलका कापरा सुटला होता. सगळं असं डोळ्यासमोर नाचायला लागलं, काय आहे हे? रात्री पाहिलेलं ते सगळं आठवून अचानक हॉरर फील यायला लागला. काय प्रकार आहे हा? सगळंच जरा कोड्यात टाकायला लागलं! तेव्हा असं वाटलं आता एकदा पाहुनच यावं, पण एवढ्या भयाण रात्री, तो किर्रर्र काळोख पाहून नुसती धडधड होतं होती. तोंडावर पांघरुन घेऊन मी गच्च डोळे मिटले. काल मी जशी घाबरंले हे पाहून त्याने अंगणात आणि वापरातल्या खोल्यांमध्ये लाईटची सोय केली होती. आता मात्र तरी आजू बाजूला उजेड