ह्या कोविड मारामारीच्या दरम्यान मी काय शिकले?

  • 7.9k
  • 2k

पेराल तसे उगवेल', 'जशास तसे', 'स्वतः कुर्‍हाडीवर पाय देणे' अशा अनेक मराठीतील प्रचलित म्हणी आपण ऐकतो किंवा उच्चारतो.मात्र यातील शोकांतिका अशी की, मानवानेच या म्हणी बनवल्या आहेत आणि त्याला त्याचा अर्थ माहित असुन देखील तो त्या पाळत नाही. सांगायचचं झालं तर, आचरणात किंवा त्याच्या वागण्यात आणत नाही. परंतु आज आपल्याला ह्या म्हणी चांगल्याच अनुभवायला मिळालेल्या आहेत. आज एका लहान मुलांपासून तर वयोवृद्धांच्या तोंडातून एक शब्द नऊ ते दहा वेळा नक्की ऐकायला येतो तो म्हणजे "कोरोना". जिकडे बघाल, जिथे बघाल, जसे बघाल तिथे कोरोना, कोरोना आणि फक्त कोरोना. एखाद्या मतदानाच्या