मेहंदी

  • 7.1k
  • 2.2k

आज प्रणिताच्या घरात सर्वांची खूपच लगबग चालू होती. प्रत्येकजण आपापल्या घाईत होते आणि प्रणिता मात्र अगदी शांत बसून स्वतःला आरश्यात न्याहाळत होती. ती दिसायला सुंदर जरी नसली तरी नाकी डोळी छान, मध्यम बांधा आणि उंची सर्वसाधारण होतं. प्रणिताने लग्न करण्यास होकार दिला म्हणून घरच्यांची स्थळ पाहण्याची एकच घाई चालली होती. आज बाजूच्याच गावचे रामराव प्रणिताला पाहायला येणार होते. त्यामुळे घरातल्या सर्व मंडळींची जुळवाजुळव करण्याची घाई चालू होती. शेजारच्या गावचा रामराव म्हणजे एक चांगली शेत जमीन असलेला जमीनदार माणूस आणि त्याचा एकुलता एक मुलगा प्रसाद जो की पदवी पर्यंत शिक्षण घेतलं पण पुढील शिक्षण थांबवून आपल्या शेतीकडे लक्ष द्यायला लागला. नोकरीची