बंध हृदयाचे हृदयाशी!..... ( भाग 2)

  • 7.8k
  • 2.5k

? बंध हृदयाचे हृदयाशी...(भाग 2).? ती बसते....पण डॉ. अजूनही वर पाहत नाही....मोना मात्र त्याच्याकडे पाहत असते...विचारात हरवते.......एक सुंदर मुलगी यांच्यासमोर बसली आहे तरीही याला वर पाहायला वेळ नाही!......कमाल आहे बाबा याची!.....किती क्युट दिसतो ना हा!....नाकावर गोल्डन दांडीचा चष्मा तर खूपच सुंदर!.....आधीच हा सुंदर,त्यात अजून व्हाईट शर्ट!.....स्टेजवर बक्षीस घेताना काय छान खळी पडली होती ना,याच्या गालावर!.....हाय!....आता जर याने एखादी शायरी माझ्यावर म्हटली तर!....किती मज्जा येईल ना!..... माझ्या स्वप्नातला राजकुमार हाच आहे का?.... इतक्यात ऋषी तिच्याकडे पाहतो..... " ओह,हॅलो......मिस...." चुटकी वाजवून तिला जागेवर आणतो..... आपली मोना मग जर स्वप्नांच्या राज्यातून बाहेर येते.....म्हणते...."अ.....क....काय