Bandh hrudayache hrudayashi - 2 books and stories free download online pdf in Marathi

बंध हृदयाचे हृदयाशी!..... ( भाग 2)






💞 बंध हृदयाचे हृदयाशी...(भाग 2).💞

ती बसते....पण डॉ. अजूनही वर पाहत नाही....मोना मात्र त्याच्याकडे पाहत असते...विचारात हरवते.......एक सुंदर मुलगी यांच्यासमोर बसली आहे तरीही याला वर पाहायला वेळ नाही!......कमाल आहे बाबा याची!.....किती क्युट दिसतो ना हा!....नाकावर गोल्डन दांडीचा चष्मा तर खूपच सुंदर!.....आधीच हा सुंदर,त्यात अजून व्हाईट शर्ट!.....स्टेजवर बक्षीस घेताना काय छान खळी पडली होती ना,याच्या गालावर!.....हाय!....आता जर याने एखादी शायरी माझ्यावर म्हटली तर!....किती मज्जा येईल ना!.....
माझ्या स्वप्नातला राजकुमार हाच आहे का?....

इतक्यात ऋषी तिच्याकडे पाहतो.....
" ओह,हॅलो......मिस...." चुटकी वाजवून तिला जागेवर आणतो.....

आपली मोना मग जर स्वप्नांच्या राज्यातून बाहेर येते.....म्हणते...."अ.....क....काय म्हणालात का?...."

" हो,मगाशी तुम्ही म्हणालात!..मला ओळखता ते कसे काय?....."

" मी ना!....ते......" मोनाची त्याला पाहून बोबडी वळलेली असते....तरीही एक दीर्घ श्वास घेऊन ती बोलते....

" आजच्या कवी संमेलनात मी पाहिले तुम्हाला!....काय छान लिहता हो तुम्ही?....मी तर तुमची खूप मोठी फॅन आहे!....तिथे ऑटोग्राफ घ्यायला आले होते,मी तुमचा!... पण गर्दीमुळे जमलं नाही!.. मागच्या महिन्यात तुमचा
"माझ्यातली ती " हा प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला...खूप छान लिहलाय..... मला तर खूपच आवडला....अप्रतिम आहेत त्यातल्या कविता,खरंच!....आता एक ऑटोग्राफ द्या ना plzzz!..."असं म्हणून तिने ऑटोग्राफ साठी तिचा हातच पुढे केला....

" ऑटोग्राफ द्यायला बुक वगैरे नाही का?...."

" ओहह,सो,सॉरी!..."

मोना तर बुक द्यायला विसरली....तिच्या मनाने तर त्याच नाव हृदयावर कोरायच होतं... पण at least बुक हवी ना!....मग ती बुक काढते....देते त्याला!.....

तो sign करतो....ती फक्त त्याला न्हाहळते......

मग त्यांचं जनरल बोलणं....कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम करते?...and all हे सगळं होतं आणि ती जायला निघते.. कारण आता बऱ्यापैकी संध्याकाळ झालेली असते...तिची आई घरी वाट पाहत असेल....सकाळपासून मोनाबाई बाहेरच होत्या...तशी ती नेहमीच असायची,पण आज तिच्या आईचा एकही फोन नव्हता...म्हणूनच ती काळजी करून फोन करेल...आणि मग प्रश्नांची उत्तरं आणि सूचना....इतकं सगळं तिला नको होतं...म्हणून ती जायला निघते....

..इतक्यात एक बाई धावत डॉ. ऋषीच्या केबिनमध्ये शिरते...मोठमोठ्याने रडू लागते....

" डाक्टर,माझ्या पोराला वाचवा,माझ्या पोराला वाचवा....."
डॉ. ऋषी च्या पायावर लोटांगण घालते.....तो त्या बाईला उठवतो आणि विचारतो.....

" हो,हो,बाई!...काय झालं?.....सांगा मला!....रडू नका!...."

" माझा पोरगा.....माझ्या पोराला वाचवा!.... त्याला साप चावलाय, तो डोक्टर म्हणतो,न्हाय वाचणार म्हणून!.. जितकं पैकं लागतील,तितकं देईल मी!....पण माझ्या पोराला वाचवा!....मी तुमच्या पाया पडते....."

" अहो बाई,चला मी पाहतो,तुमच्या मुलाला नक्की काय झालं?....चला पाहुयात!...."

डॉ. ऋषी,ती घाबरलेली बाई,डॉ.मोना ,इतर एक दोन डॉक्टर धावतच सगळे बाहेर जातात....

त्या बाईचा मुलगा,साधारणपणे 8,10 वर्षाचा असेल....एक माणूस त्याला हातात घेऊन उभा असतो!......

डॉक्टर ऋषी त्या मुलाला चेक करतात,त्याला साप चावलेला असतो,आणि विष अंगभर पसरायला सुरुवात झालेली असते,त्यामुळे त्याला वाचवणं कठीण असतं.....

डॉ. ऋषी ओरडतात...
" nurse,,,,,wardboy,,,या मुलाला ऍडमिट करा,ताबडतोब!..... "

"डॉक्टर, ऍडमिट फी भरायला पैसे नाहीत,त्यांच्याकडे!... recepinist म्हणाली.....

"डाक्टर, मी देते ना नंतर..., तोपर्यंत या माझ्या बांगड्या घ्या,सोन्याच्या हायेत,पण माझ्या पोराला वाचीव...."
ती बाई म्हणाली....

"nurse, याला ऍडमिट करा.fee हवी तर माझ्या account मधून trasfer करतो,पण सध्या याला उपचारांची गरज आहे.... ,या आणा त्या मुलाला इकडे!...."

त्या मुलाला ते operation theatre (O.T.)मध्ये नेतात,
डॉ. ऋषी,मोनिका, इतर डॉक्टरांना बोलवतात,म्हणतात,

" only 10% chance to live,but we try our best,
पण मला तुमची सगळ्यांची साथ हवीय?...कराल ना!...."

सगळा स्टाफ पटकन operation ची तयारी करतात,डॉ. ऋषी बाहेर जाऊन त्या बाईला भेटतात,म्हणतात,
" हे बघा बाई,तुमच्या मुलाला वाचवणं जवळजवळ अवघड आहे,कारण विष पूर्ण अंगात पसरायला सुरुवात झाली आहे, तरीही आम्ही प्रयत्न करत आहोत,पण बाकी देवाची मर्जी!..…"

" हो,डाक्टर,तुम्हांला काय हवं ते करा,पण पोराला वाचवा,एकच पोर हाय मला!...."बाई रडत रडत म्हणते....

डॉ. सिस्टरांना हाक मारून पुढची कागदपत्रे भरून घ्यायला सांगतात आणि O.T. मध्ये जातात....

इकडे मोनाही आपल्या आईला आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत सांगते आणि यायला उशीर होईल असे सांगून फोन ठेवते.....

खूप वेळ operation चालू असते....ती बाई आणि तो माणूस देवाची प्रार्थना करतात.... तिचा मुलगा वाचवा म्हणून!......

( क्रमशः)

....प्रिया...

(पुढच्या भागात पाहुयात त्या मुलाचे काय झाले?....ऋषी मोना यांची मैत्री होईल?....आणखी खूप काही!....प्रतीक्रिया कळवा,धन्यवाद!.....)


इतर रसदार पर्याय