बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1) प्रिया... द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)





💞 बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)💞

एका नामांकित सभागृहात शहरातल्या कवीचं कवी संमेलन चालू असते.....त्यात खूप मोठमोठ्या कलाकारांनि सहभाग घेतलेला असतो....कवी संमेलन म्हटलं..की हास्य, दर्दभरी,राग,प्रेम अशा अनेक प्रकारच्या कविता ऐकायला मिळतात.....म्हणूनच सभागृह खचाखच भरलेले असते....अनेक कवीताप्रेमींची हजेरी लावलेली असते....
एक एक जण आपली कविता सादर करत असतात...कोणत्याही विषयावर कविता सादर केलेली चालणार असते....अशातच एक कवी आपली कवीता सादर करण्यासाठी पुढे येतात...बोलू लागतात....

" नमस्कार कविप्रेमींनो,
मी डॉक्टर. ऋषीकेश......

माझ्या कवितेचे नाव आहे......

💕 माझ्या हिला कधी जमलंच नाही... 💕

प्रेयसी म्हणून आयुष्यात आली,
रुसणं,फुगणं तिला जमलं नाही,
बायको म्हणून आयुष्यभर जगली,
हक्क गाजवणं तिला जमलं नाही!. .

उशिरा पोहोचलो घरी कधी जरी,
प्रश्नांची सरबत्ती करणं जमलं नाही,
मीच रागावलो कधी जर,
माझ्यावर रागावण तिला जमलं नाही!....

दिवाळीला साडी घेतली नाही,
म्हणून रुसणं तिला जमलं नाही,
माझ्या प्रश्नांवर प्रश्न करणं,
तिला कधी जमलं नाही!...

साधी भोळी सरळ ती,
छक्केपंजे खेळणं जमलं नाही,
बाहेरून आल्यावर दमली म्हणून,
थकणं तिला जमलं नाही,,

घरात एखादी गोष्ट नाही म्हणून,
हट्ट करणं तिला जमलं नाही,
रागावून ती कधी बसलीच नाही,
म्हणून मनवणं तिला,मला कधी जमलं नाही!....

अशी घरातली कर्ती ती,
कर्ता म्हणवून घेणं तिला जमलं नाही,
अगदीच भोळीभाबडी साधी ती,
मनमानी करणं तिला जमलं नाही!.....

माझ्या हिला रुसणं कधी जमलं नाही!.....
तिला समजणं,मला उमजलं नाही!....
मला उमजलं नाही!.....💕......💕

कविता संपते....टाळ्यांचा कडकडाट होतो.....समोर बसलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच वन्स मोअरचा जल्लोष उडाला....निवेदकांनी कसतरी पब्लिकला शांत केलं...पुढं सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला..... मान्यवरांच्या हस्ते प्रथम आणि द्वितीय क्रमांकाला बक्षीस देण्यात आले....तिसरे बक्षीस.....डॉक्टर. ऋषीकेश यांना देण्यात आले!...हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष उडाला..

डॉ.ऋषिकेश म्हणजे 28-29 वर्षांचा युवक,एक हसतमुख व्यक्तिमत्त्व,....simple dresssing,tall and handsome, dashing.!.......एक simple चष्मा नाकावर वर चढवत तो बक्षीस स्वीकारतो!...
त्याला पाहून तिची विकेटच उडते!....हाय!....कसला भारी दिसतो हा!....लई भारी!.....5 मिनिटे ती त्याच्या विचारात हरवते!.....तो बक्षिस घेऊन स्टेजवरून खाली उतरतो!.....लगेचच त्याची sign घेण्यासाठी fans ची झुंबड उडते!.....

तिलाही त्याची sign हवी असते!...किंबहुना जवळून एकदा त्याला पहावस वाटतं म्हणूनच ती त्या गर्दीत शिरते...पण इतकी गर्दी असते की ती त्याच्यापर्यंत पोहचू शकत नाही!..….ओहहह!....शीट!....इतक्यात त्याला एक फोन येतो आणि घाईघाईने तो निघून जातो!.....
फोन हॉस्पिटल मधून आलेला असतो!....एका छोट्या मुलाचे तातडीचे operation असते!....तो सगळी तयारी करतो....केस स्टडी करतो... त्याच्या पूर्ण टीमला instruction देतो....आणि operationला O.T.मध्ये पोहोचतो.......सगळे आलेले असतात....child specialist बोलावले असतात...
डॉ. ऋषी सिस्टरला म्हणतात,"ते child specialist आले का?...सगळी तयारी झाली?.."

सिस्टर म्हणतात,"हो,या मिस.मोनिका...child specialist....."

"हॅलो डॉक्टर...."

आपली मोना म्हणजे डॉ. मोनिका...कवी म्हणजे डॉ. ऋषी यांना इथे पाहून जर थबकतात बरं का!.....ज्याचा ऑटोग्राफ तिला मिळवणं मुश्किल झालं होतं,काही काळापूर्वी!.. .तोच आता तिच्या समोर उभा होता!... ती त्याला पाहून खूप खुश झाली....पण हे सगळं बोलण्याची ही वेळ नव्हती......तिने

मग डॉक्टरला म्हटले,"मी ओळखते तुम्हाला!..
but let we finish this work!..."

डॉ. ऋषीच्या डोळ्यात एक आश्चर्य झळकते.....पण next मिनिटाला तो आपले काम करायला लागतो!....
operation संपते...मग फ्रेश होऊन तो तिची वाट पाहत बसतो!.....


डॉ. ऋषी तिची वाट पाहत बसतो....म्हणजे तो काही रिकामा नाही बरं का!.....लॅबटॉपवर काही काम करत असतो....डॉ.मोनिका इकडे फ्रेश होते आणि डॉ. ऋषी यांच्या केबिनमध्ये जाते...डॉ. ऋषी लॅपटॉप वर busy असतात...

" May I come in?..."

"ohh,yes!...Miss.....???"

"Monika!......"

"Yaa,Come in Dr...,plz seat down!...."

ती बसते....पण डॉ. अजूनही वर पाहत नाही....मोना मात्र त्याच्याकडे पाहत असते...विचारात हरवते.......एक सुंदर मुलगी यांच्यासमोर बसली आहे तरीही याला वर पाहायला वेळ नाही!......कमाल आहे बाबा याची!.....किती क्युट दिसतो ना हा!....नाकावर गोल्डन दांडीचा चष्मा तर खूपच सुंदर!.....आधीच हा सुंदर,त्यात अजून व्हाईट शर्ट!.....स्टेजवर बक्षीस घेताना काय छान खळी पडली होती ना,याच्या गालावर!.....हाय!....आता जर याने एखादी शायरी माझ्यावर म्हटली तर!....किती मज्जा येईल ना!.....
माझ्या स्वप्नातला राजकुमार हाच आहे का?....

( क्रमशः )

💞 .प्रिया... 💞

(पुढील भागात पाहुयात,त्यांची ओळख......मैत्री होईल का त्यांच्यात?...ती त्याला कशी ओळखते?...पाहुयात!.. नेक्स्ट भागात!....कथा कशी वाटली नक्की कळवा. .)