बंध हृदयाचे हृदयाशी!..... (भाग 3) प्रिया... द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

बंध हृदयाचे हृदयाशी!..... (भाग 3)







💞 बंध हृदयाचे हृदयाशी!...(भाग 3)..💞

खूप वेळ operation चालू असते पण लाल लाईट काही बंद व्हायचं नाव घेत नव्हता...सगळयांच्या मनातली धाकधूक फार वाढत होती....काय होईल याचा विचार करून!....आणि एकदाचा लाल लाईट बंद झाला....
सगळे O.T.च्या दरवाजाकडे पाहत होते....इतक्यात डॉ.ऋषी बाहेर आले...त्या बाईजवळ येऊन म्हणाले......
" आम्ही आमचं काम केलं आहे...पण आता देवाची इच्छा!..
येत्या 24 तासात त्याला शुद्धीवर येणं गरजेचं आहे...पाहुयात ,आता !....विश्वास ठेवा,देव करेल सगळं नीट!...."

ती बाई आणि माणूस दोघेही डॉ. ऋषी यांच्या पायावर डोके ठेवतात.....म्हणतात," तुमचे उपकार आमी कसं फेडू डाक्टर?...."दोघेही खूप रडू लागतात...

" हे बघा,देवाची प्रार्थना करा,आता सगळं त्याच्या हातात आहे...."डॉ. ऋषी असे म्हणून त्यांची सांत्वना करतात आणि त्यांचे पुढील कार्य करण्यासाठी निघून जातात....

इकडे डॉ. मोनिका फ्रेश होऊन येते आणि तिला डॉ. आदित्य (जे डॉ. ऋषी यांना assist करतात) हे दोघे भेटतात आणि आदित्य तिला कॉफी साठी विचारतो,ते दोघेही (मोना आणि आदित्य )आदित्यच्या केबिन मध्ये कॉफी घेत बसलेले असतात,त्यांचं बोलणं सुरू होतं....

" काय मग,कसं वाटलं आमचं हॉस्पिटल?....तुम्ही पहिल्यांदा इकडे आला होतात ना?...."आदित्य म्हणतो...

" हो,छान आहे, स्टाफ पण छान आहे, शिवाय डॉक्टर सुध्दा!...specially डॉ. ऋषी!....कामाशी अगदी निष्ठावंत आहेत,गरजू लोकांना मदत फार करतात,असं दिसतंय!...."मोना म्हणते....

" हो,करतात ना!...आणि स्वतः जातीने लक्ष देऊन पेशंटची काळजी घेतात,मी पण मागील एक वर्षांपासून प्रॅक्टिस साठी इथे आहे....!तसं तुमचं, स्वतंत्र हॉस्पिटल पण आहे का?......"आदित्य विचारतो....

"हो,आहे ना!...तिथे सकाळी O.P.D. असते आणि नंतर इतर ठिकाणी जाते,पण आज सुट्टी घेतली होती कारण आज मी कवी संमेलनला गेले होते...."मोना म्हणते....

" आज?...आमचे ऋषी सर सुद्धा गेले होते....त्यांनाही आवड आहे,साहित्याची!...आज तर त्यांना 3rd prize पण मिळाले.....मागील महिन्यात त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला....मी वाचला आहे,मस्त लिहतात आमचे सर!...."

" हो,मी पण वाचला आहे बरं का!....आणि सगळ्यात मोठी फॅन आहे त्यांची!...आज.मी पाहिलं त्यांना prize घेताना!...."मोना ऐटीत म्हणाली....

तिच्या अशा बालिश बोलण्यावर दोघांनाही एकदम हसू आले....

इतक्यात ऋषी तिथे येतात आणि म्हणतात,

" काय हास्यधुर पसरला आहे?....आज घरी जायचं नाही का?.....सॉरी मिस मोनिका,माझ्यामुळे तुम्हाला आज लेट झालं का?..."

"नाही,its ok, आपलं कामच आहे पेशंटची सेवा करणं!...."
मोना म्हणते....

"चला मग निघुयात?...मला जेवून पुन्हा हॉस्पिटलमध्ये यायचं आहे,त्या पेशंट साठी आज मी इथेच थांबणार आहे....तसे इतर दोन डॉक्टर आणि night सिस्टर सुद्धा आहेत..."ऋषी म्हणाला.....

होकारार्थी मान हालवून सगळे निघतात....ऋषी आदित्यला सकाळी लवकर यायला सांगतो आणि आदित्य जातो....

" By the way, तुम्ही आता कसं जाणार?...म्हणजे गाडी आणली आहे का?..."ऋषी मोनाला म्हणाला....

" आज नाही आणली...बघते,कॅब मागवते..."

" कॅब यायला उशीर लागेल, मी ड्रॉप केलं तर चालेल का?..."

" हो,तुम्हाला उशीर होणार नसेल तर?..."

" नाही! उशिर कसला?..."

ते दोघेही गाडीत बसतात...गाडी सुरू होते.....ऋषी विचारतो," तुम्ही कुठे राहता?..."

" मी जुन्या शहरात .****.बिल्डींग मध्ये राहते...."

" मी पण त्याच रोडला पुढे राहतो!....बाकी O.P.D.छान चालू आहे ना!...."

काय बोरींग बोलतोय हा!...काहीतरी रोमँटिक छान असं बोलता नाही येत काय याला?....असं मनातच मोना म्हणते....आणि गाडीतला FM. चालू करते....गाणं चालू होत नाही,काही प्रॉब्लेम असतो बहुधा....

" प्रॉब्लेम आहे काहीतरी साऊंड सिस्टीम मध्ये....आवाज येत नाही,दाखवावं लागेल एकदा!...."

" सर,एखादी कविता म्हणा ना,तुमच्या "माझ्यातली ती" या कवितासंग्रह मधली....."

" कोणती?...."

" ती .... माझ्यातली ती फक्त माझीच असायची!...

ऋषी बोलू लागतो........

--------////---------------////-------------------////----------------

💕 माझ्यातली ती फक्त माझीच असायची!...💕

ती नेहमी खरं बोलायची,
म्हणूनच सगळ्यांच्या डोळ्यात सलायची,
ती फक्त माझ्याशीच बोलायची,
म्हणून इतरांची खूप जळायची,,

माझ्यावर हृदय भरून,
प्रेम ती करायची,
सांगायची नाही कधी पण,
नेहमी डोळ्यातुन मला दाखवायची,,

माझ्याशी जवळीक केली जर कुणी,
एक जळजळीत कटाक्ष ती टाकायची,
कबाब मधील हड्डी सारखं बाजूला करून,
काही घडलंच नाही असं ती दाखवायची,,

माझी ती फक्त माझीच असायची,
गर्व आणि प्रेम माझ्यावर करायची,
प्रेमाची बरसात जेव्हा माझ्यावर करायची,
माझ्यातली ती फक्त माझीच असायची!...
माझ्यातली ती फक्त माझीच असायची!...

-------------///----------------////--------------///-----------------

" वाह,वाह,अप्रतिम, खूप सुंदर!....शब्दच नाहीत यावर बोलायला!....इतकं सुंदर कसं सुचत तुम्हाला?...." मोना विचारते....

ऋषी फक्त एक छान गोड smile देतो आणि त्याच्या गालावर एक खळी पडते....

" वाह,किती गोड smile!....त्यात ही गालावरची खळी amazing!.....एकदम फिल्मी हेरोच दिसतोस रे,तू ऋषी!....." मोना चटकन हे सगळं बोलून तर गेली...पण एकदम दोघेही शांत झाले.....मोनालाही खूपचं कसतरी वाटलं,स्वतःच्या बोलण्याबद्दल!...ती खाली मान घालून सॉरी म्हणू का?..असा विचार करू लागली..... पण असो....

इतक्यात ती राहत असलेल्या बिल्डिंगजवळ गाडी थांबते....ती गाडीतून उतरते.....ती त्याला बाय बोलणार...तेवढ्यात त्याला फोन येतो....

" हो,अगं पोहचतो मी पाच मिनिटांत!...I am.on the way!..."ऋषी बोलतो....

मोना त्याला बाय म्हणते...ऋषी जातो....
ती विचार करते....फोन करणारी कोण असेल?....आई,वहिनी,बहीण की बायको?... ..कोण असेल नक्की?. .

( क्रमशः )

......प्रिया ...