दाट काळोख पसरला होता. आज बहुतेक अमावस्या असावी. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घर होती, पण यावेळी साहाजिकच सगळ्या घरांच्या लाइट्स बंद होत्या. क्वचित एखाद्या घराबाहेर एखादा बल्ब जळताना दिसायचा. चिडीचूप शांतता पसरलेली होती. मनोहर आपल्याच विचारात मग्न होऊन चालला होता. चहुबाजूंनी पसरलेल्या काळ्याकुट्ट अंधाराकडे, भीतीदायक वातावरणाकडे त्याच बिलकुल लक्ष नव्हत. अर्थात, असतं तरी त्याला काही फरक पडला नसता. मनोहर वाकडे. दिसायला चारचौघांसारखाच. गहूवर्णी चेहरा, मध्यम उंची, किंचीत बेडौल बांधा, नाकी डोळी बरा. व्यक्तिमत्वातही विशेष असं काही नव्हतं. स्वभावही जरा विक्षिप्तच. त्याच्यात इतरांना आवडावी अशी एकच गोष्ट होती. ती म्हणजे त्याच बोलणं. कुठल्याही विषयावर त्याची मते तो इतक्या रोखठोक व