संतश्रेष्ठ महिला भाग ५

  • 8k
  • 2.7k

संतश्रेष्ठ महिला भाग ५ या परंपरेतील दुसरे नाव आहे संत जनाबाई यांचे जनाबाईंचा जन्माचा ठोस काळ जरी माहित नसला तरी देखील अंदाज त्यांचा जन्म हा 1258 काळातील असल्याचे काही पुरावे आढळुन येतात जनाबाईंचा जन्म परभणी येथील गंगाखेड येथील दमा नावाच्या विठ्ठलभक्ताच्या घरी झाला. जनाबाईंच्या एका अभंगातील "माझ्या वडिलांचे दैवत| तो हा पंढरीनाथ ||" या ओळींवरून त्यांचे वडील दमा हेदेखील विठ्ठल भक्त होते हे समजते . त्यांच्या आईचे नाव करुंड. त्याही भगवद्भक्त होत्या. ते उभयता दरवर्षी पंढरीची वारी करत होते. आपल्या मुलीचे पालन पोषण करण्यास आर्थिक दृष्ट्या अक्षम असल्याचे समजल्यामुळे, पिता दामा यांनीत्यांना संत नामदेव यांचे वडील