संतश्रेष्ठ महिला भाग ६

  • 9.5k
  • 2.2k

संतश्रेष्ठ महिला भाग ६ संत नामदेव हे संत जनाबाईंचे गुरु असल्याने आणि त्यांच्याकडे सर्व संतांचे येणे जाणे असल्याने संत ज्ञानदेवांच्या प्रभावळीतील सर्व संतांना त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले होते . त्यांना संत नामदेवांमुळे सतत संतसंग घडला होता. त्यामुळे जनाबाईंनी आपल्या अभंगांची नावे ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ आणि ‘जनी नामयाची’, अशी ठेवली आहेत. या दासीपणाची, स्वत:च्या शूद्र जातीची आणि स्वत:च्या ‘स्त्री’पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग संत जनाबाई यांच्या मनातून त्यांच्या शब्दांत उमटले आहेत. विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी ‘सखा’, ‘जिवाचा मैतर’ समजणार्‍या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो. अतिशय सामान्यातली सामान्य, अशी जनाबाईची ओळख. पण आयुष्यभर मोलकरणीचे काम करणार्‍या