संतश्रेष्ठ महिला भाग ९

  • 7.1k
  • 2k

संतश्रेष्ठ महिला भाग ९ यामध्ये नंतर नाव येते बहिणाबाई यांचे .. संत बहिणाबाई या वारकरी संप्रदायातील असुन मराठी संत कवयित्री आणि संत तुकाराम महाराजांच्या शिष्या म्हणुन ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या प्रमुख स्त्री संत होउन गेल्या जनाबाई, मुक्ताबाई, वेणाबाई, कान्होपात्रा, मीराबाई, आक्काबाई यांमध्ये संत बहिणाबाईंचे देखील मानाचे स्थान आहे. प्रपंच परमार्थ चालवी समान|| तिनेच गगन झेलियेले। संत बहिणाबाईंचे हे उपकारच म्हणावयास हवेत की त्यांनी आत्मनिवेदन लिहिले. संत तुकारामांच्या शिष्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. इ.स. १६२८ ते १७०० हा त्यांचा कार्यकाल. संत बहिणाबाईंच्या अभंगात आरंभी आदिनाथ शंकरापासून गुरूपरंपरा दिलेली आहे. त्यानंतर आत्मनिवेदनपर अभंगातून त्यांचे जीवन उलगडते. हे अभंग त्यांचे खास वैशिष्ट्य आहे