संतश्रेष्ठ महिला भाग १०

  • 8.1k
  • 2.5k

संतश्रेष्ठ महिला भाग १० यावेळी बहिणाबाईंचे वय १८ वर्षांचे होते. तुकोबाराय स्वप्नात आलेला अनुभव त्या अनेकदा सांगत. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांनी बहिणाबाईंच्या अभंगांचे सखोल अध्ययन करून त्यांना उपनिषदांचे सार उत्कटपणे मांडणारे अभंग म्हटले आहे. शांकरभाष्याप्रमाणे शास्त्रीय आणि वामन पंडिताइतकी त्यांची भाषा शुद्ध आहे, असेही गुलाबराव महाराज म्हणतात. काव्यदृष्ट्यादेखील बहिणाबाईंचे अभंग सरस आहेत. अनुप्रास, यमक, उपमा, रूपक, दृष्टांत, अनन्वय, विरोधाभास अशा अनेक अलंकारांनी ते नटले आहेत. करूणरस, वत्सलरस, हास्यरस, भयानकरस, अद्भुतरस, वीररस, भक्तीरसाने ओतप्रेत भरले आहेत. शांतरसाचा आविष्कार काव्यात सर्वत्र दिसतो तुकाराम महाराजांनी स्वप्नात बहिणाबाईंना “अनुग्रह” देऊन कवित्वाची आज्ञा दिली होती . योगायोग म्हणजे तुकाराम महाराज यांनाही नामदेव महाराजांनी स्वप्नामध्येच