जैसे ज्याचे कर्म! (भाग ५) पंचवीस वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील पदवी घेवून आलेल्या अजय गुंडे नावाच्या तरुण डॉक्टरने त्या शहरात एका छोट्या खोलीमध्ये स्वतःचा दवाखाना सुरु केला. एका नव्या जाणिवेने आणि समाजसेवेचे व्रत घेवून वेगळ्याच स्फूर्तीने तो युवक काम करू लागला. हळूहळू व्यवसायात त्याचा जम बसत होता. हातगुण चांगला यासोबत एक सकारात्मक दृष्टीकोन असलेला, आर्थिकतेपेक्षा माणुसकी जपणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होत होती. दूरवरचे पेशंट त्यांच्या दवाखान्यात येत होते. असे सारे सुरळीत चालू असताना एका रात्री सोबतचा कर्मचारी निघून गेलेला असताना अचानक एक जीप डॉ. गुंडे