Jaise Jyache Karm book and story is written by Nagesh S Shewalkar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Jaise Jyache Karm is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
जैसे ज्याचे कर्म - कादंबरी
Nagesh S Shewalkar
द्वारा
मराठी फिक्शन कथा
डॉ. गुंडे यांच्या प्रशस्त, टोलेजंग दवाखान्यातील भव्य वातानुकूलित शस्त्रागारामध्ये एका वीस वर्षीय युवतीवर गर्भपाताची शस्त्रक्रिया आटोपून डॉ. गुंडे यांनी हातमोजे, चेहऱ्यावरील मास्क काढला. कोपऱ्यामध्ये असलेल्या बेसीनमध्ये हात स्वच्छ धुतले. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून त्यांनी जवळच असलेल्या भिंतीतले कपाट उघडले. कपाटातील एक रजिस्टर काढताना त्यांना जाणवले की, ते त्या शस्त्रक्रियेच्यावेळी नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. त्या युवतीजवळ गेल्यापासूनच एक विचित्र जाणीव त्यांच्या शरीरामध्ये पसरली होती. वातानुकुलित दालन असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. खिशातील रुमाल काढून त्यांनी घाम टिपला. त्यांच्यासमोर असलेल्या फॉर्ममधील माहिती त्यांनी त्या गुप्त रजिस्टरवर लिहिली. क्रमांक लिहिताना ते मनाशीच म्हणाले,
जैसे ज्याचे कर्म! (भाग १) डॉ. गुंडे यांच्या प्रशस्त, टोलेजंग दवाखान्यातील भव्य वातानुकूलित शस्त्रागारामध्ये एका वीस वर्षीय युवतीवर गर्भपाताची शस्त्रक्रिया आटोपून डॉ. गुंडे यांनी हातमोजे, चेहऱ्यावरील मास्क काढला. कोपऱ्यामध्ये असलेल्या बेसीनमध्ये हात ...अजून वाचाधुतले. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून त्यांनी जवळच असलेल्या भिंतीतले कपाट उघडले. कपाटातील एक रजिस्टर काढताना त्यांना जाणवले की, ते त्या शस्त्रक्रियेच्यावेळी नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. त्या युवतीजवळ गेल्यापासूनच एक विचित्र जाणीव त्यांच्या शरीरामध्ये पसरली होती. वातानुकुलित दालन असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. खिशातील रुमाल काढून त्यांनी घाम
जैसे ज्याचे कर्म! (भाग २) "साहेब... साहेब..." गणपतने पुन्हा आवाज दिला. तसे डॉ. गुंडे वास्तवात परतले. समोरच्या रुमालाने त्यांनी कपाळावरचा घाम पुन्हा एकदा टिपला. ते पाहून गणपतने विचारले,"काय झाले साहेब? तब्येत बरी ...अजून वाचाका? नाही म्हटलं सारखा घाम येत आहे... ए. सी. चालू असताना घाम येणे बरे नाही.""तसे काही नाही रे. तब्येत चांगली आहे पण का कोण जाणे आजची केस हातात घेतल्यापासून कशी वेगळीच मनःस्थिती झाली आहे. गणपत, तुला इथे काम करुन किती वर्षे होत आहेत रे?""कुणी मोजली साहेब?
जैसे ज्याचे कर्म! (३) शस्त्रक्रियेच्या दालनातून बाहेर पडलेल्या गणपतला दवाखान्याची स्वच्छता करणारी रखमा दिसली. तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला, "रखमा, थोडे नदीपर्यंत जाऊन येतो." "बरे. जाऊन या. पण जरा सांभाळून हं. आज ...अजून वाचाकसुनकसं होतेय बघा." "अग, मी काय नवीन आहे का? काळजी करू नकोस. पण आज तुम्हाला झालंय तरी काय? साहेब पण घामाघूम होत आहेत, अस्वस्थ वाटतय असे म्हणत आहेत. तू बी आस बोलती... बरे, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. कुणी हा माझ्या हातातील आहेर पाहिला तर अवघड
जैसे ज्याचे कर्म! (भाग ४) डॉ. गुंडे विचारात गुंतलेले असताना टेबलावरील युवतीची स्वच्छता करणारी नर्स म्हणाली, "डॉक्टर पे..पे..पेशंट..." "काय झाले?" नर्सचा कंपायमान आवाज ऐकून डॉक्टरांनी विचारले. "बघा ना, कशी अस्वस्थ वाटतेय, डोके ...अजून वाचागळ्यातून वेगळाच आवाज येतोय. हातपाय ताठ करतेय..." नर्स बोलत असताना डॉ. गुंडे टेबलाजवळ आले. त्यांनी मुलीची नाडी पाहिली. ती व्यवस्थित होती. तितक्याच त्यांचे लक्ष मुलीच्या चेहऱ्याकडे गेले. चेहऱ्यावर बांधलेला रुमाल पाहून ते म्हणाले, "असे का करतीय ही? नाडी तर व्यवस्थित आहे. मग घाबरल्यासारखी का करतीय? आजपर्यंत मी एवढ्या गर्भपाताच्या
जैसे ज्याचे कर्म! (भाग ५) पंचवीस वर्षांपूर्वी वैद्यकशास्त्रातील पदवी घेवून आलेल्या अजय गुंडे नावाच्या तरुण डॉक्टरने त्या शहरात एका छोट्या खोलीमध्ये स्वतःचा दवाखाना सुरु केला. एका नव्या जाणिवेने आणि समाजसेवेचे व्रत घेवून वेगळ्याच ...अजून वाचातो युवक काम करू लागला. हळूहळू व्यवसायात त्याचा जम बसत होता. हातगुण चांगला यासोबत एक सकारात्मक दृष्टीकोन असलेला, आर्थिकतेपेक्षा माणुसकी जपणारा डॉक्टर अशी त्यांची ख्याती होत होती. दूरवरचे पेशंट त्यांच्या दवाखान्यात येत होते. असे सारे सुरळीत चालू असताना एका रात्री सोबतचा कर्मचारी निघून गेलेला असताना अचानक एक जीप डॉ. गुंडे