Like whose karma - 10 - the last part books and stories free download online pdf in Marathi

जैसे ज्याचे कर्म - 10 - अंतिम भाग

जैसे ज्याचे कर्म! (भाग १०)
सायंकाळचे सहा वाजत होते. डॉ. मुंडे हे त्यांच्या दवाखान्यात जाण्यासाठी तयार होत होते. परंतु त्यांना पुन्हा नैराश्याने घेरले. निशाचा गर्भपात केल्यापासून त्यांची अस्वस्थता, तळमळ, तगमग कमी होत नव्हती. स्वतःची झालेली तशी स्थिती ती कुणाला सांगूही शकत नव्हते.सांगणार कुणाला तर पत्नीला! परंतु एकतर तिला वेळच नव्हता आणि ज्या ज्या वेळी नवऱ्याने छायाबद्दल तिच्याजवळ विषय काढला त्या प्रत्येकवेळी बायकोने त्यांनाच दरडावले. वास्तविक पाहता निशा प्रकरणानंतर छायाच्या बाबापेक्षा तिच्या आईने जास्त सावध व्हायला हवे होते. छायाला विश्वासात घेऊन हे जाणून घ्यायला पाहिजे होते की, निशाच्या सहवासात राहून छायानेही नको ते संबंध ठेवले आहेत का? तिने सामाजिक मर्यादा ओलांडल्या आहेत का? महत्त्वाचे म्हणजे छायाची पाळी चुकलीय हे तिच्या आईच्या लक्षात यायला हवे होते परंतु तिच्या आईचे ना घरात लक्ष होते ना, ना तिच्या पतीकडे होते ना छायाकडे होते. अर्थात तिचे बाहेर तसे कुठे काही संबंध नव्हते परंतु तिने स्वतःला तिच्या मैत्रिणी, तिची कामे, तिची शॉपिंग, हॉटेलिंग आणि इतर गोष्टींमध्ये अडकवून घेतले होते...
डॉ. गुंडे विचारात गुंतलेले असताना छाया तिथे आली. ती उदास दिसत होती. तिला काही तरी सांगायचे आहे हे डॉक्टरांनी ओळखले.
"छाया बेटी, काय झाले? ट्युशन नाही का?" डॉक्टरांनी विचारले.
"पप्पा, जरा अस्वस्थ वाटतेय. करमत नाही. जावेसे वाटत नाही..."
"का ग? तब्येत बरोबर नाही का?"
"तसे काही नाही. एक प्रोब्लेम झालाय, कसे सांगू तुम्हाला?..." बोलता बोलता छाया थांबल्याचे पाहून तिच्या बाबांना वेगळीच शंका आली. ते म्हणाले,
"हे बघ, असा संकोच करू नकोस. काय ते स्पष्ट सांग."
"बाबा, माझी एक मैत्रीण आहे. माझ्याच क्लासमध्ये आहे. होस्टेलवर राहते."
"तिला काय झाले? पैशाची गरज आहे का? तिच्या गावाकडून पैसे आले नाहीत का?" शंका बळावली जात असताना डॉक्टरांनी विचारले.
"नाही.पैसे नकोत पण तुमची मदत हवीय तिला."
"माझी मदत? कशासाठी?" शंका खरी ठरतीय की काय या विचाराने गुंडेंनी विचारले.
"बाबा, तिची एका मुलाशी मैत्री आहे. दोघांनी नकळतपणे सहजच..." बोलताना छाया अडखळली.
"आले लक्षात. पण नाही! छाया, नाही. मी तिचा गर्भपात करणार नाही. छाया, मला हे मुळीच पटत नाही. परवाच तू तुझ्या अशाच एका मैत्रीणीची सुटका करवलीस, नंतर ती निशा आली तीही तुझी मैत्रीणच ना? आणि आता अजून एक तशीच मैत्रीण आणि तू त्याच कारणासाठी तिची शिफारस करते आहेस? मला एक समजत नाही छाया, तू एवढी हुशार, सुसंस्कृत असूनही अशा मुलींसोबत तुझी मैत्री होऊच कशी शकते? मला तर भीती वाटतेय अशा मैत्रिणींसोबत राहून तू तर कोणत्या चक्रव्यूहात अडकणार नाहीस ना?... " डॉ. गुंडे विचारत असताना छाया गडबडीने म्हणाली,
"नाही बाबा, तसे मुळीच होणार नाही. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तुमची बदनामी होईल, तुम्हाला वाईट वाटेल असे मी काहीही करणार नाही. खरेच बाबा. या मुलीशी तशी दाट मैत्री नाही. केवळ परिचय आहे. एकाच वर्गात असल्यामुळे आणि तुम्ही डॉक्टर असल्याचे तिला माहिती असल्यामुळे तिने मला गळ घातली. दुस-या दवाखान्यात जायची तिला भीती वाटतेय. उगाच सर्वत्र बोभाटा होईल. आपल्याकडे या कानाचे त्या कानास समजणार नाही हा तिला विश्वास आहे. बाबा, खरेच विश्वास ठेवा, हिच्याशी माझी तशी मैत्री नाही. पण माणुसकी म्हणून मी तिला मदत करीत आहे..."
"छाया, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ग पण ह्या अशा मुली तुला आणि पर्यायाने मला कधी अडचणीत आणतील ते कळणारही नाही ग... ठीक आहे. तू म्हणतेस तर तुझ्या शब्दाखातर मी ही केस घेतो. केव्हा आणतेस?" डॉक्टरांनी विचारले.
"उद्या सकाळीच. चालेल? बाबा, ही उज्ज्वला मुळात फार लाजाळू आहे. तिला स्वतःलाच भयंकर गिल्टी वाटतेय. ती तुमच्या नजरेला नजर देऊ शकणार नाही. बाबा, तुम्ही माझे बाबा आहात म्हणून तिलाही तिच्या वडिलांप्रमाणेच आहात. म्हणून तिची अशी विनंती आहे की, ती दवाखान्यात आल्यापासून ते परत जाईपर्यंत तिचा चेहरा रूमालाने झाकलेला राहू द्या. बाबा, प्लीज, प्लीज माझ्यासाठी एवढे कराल ना?"
"अजबच आहे. पण यानंतर तू अशी कुणाचीही शिफारस करणार नाहीस? आणि केली तरी मी यानंतर अशा बाबतीत पुन्हा काहीही ऐकणार नाही. लक्षात ठेव."
"मुळीच नाही. थँक्यू बाबा! पण ते रुमालाचे लक्षात ठेवा. आपल्या स्टाफला बजावून ठेवा..."
'बाप रे! छाया, तुझा चेहरा मला दिसू नये म्हणून तू अशी गळ घातलीस का? मला फसविण्याचा प्रयत्न होता काय? नाही. नाही. तू मला फसवलेस छाया, तू मला फसवलेस ग फसवलेस. तू माझा विश्वासघात केलास ग. खरेतर निशा प्रकरणानंतर मी सावध व्हायला हवे होते. तुझ्यावर विश्वास ठेवायला नकोच होता. त्यातल्या त्यात चेहऱ्यावर रुमाल बांधण्याची तुझी अट मी मान्य करायला नको होती. बाळे, केवळ तुझ्या विश्वासापोटी मी तुझी अट मान्य केली पण तू... तू... मला फसवायला नको होते. आता मी काय करू...'असे स्वतःशीश बडबडणाऱ्या डॉ. गुंडे यांनी शेजारी पडलेले रिमोट उचलले. त्यांनी टिव्ही चालू केला. वाहिनीवर बातम्या चालू होत्या. अडखळत बोलणारी ती व्यक्ती पाहून गुंडे दचकले. तो... तो.. बबन होता. काही वेळापूर्वी छायाचा स्वतःच्या नकळत गर्भपात केलेले ते पार्सल घेऊन बाहेर पडलेल्या बबनला एका संघटनेच्या युवकांनी रंगेहाथ पकडून मुद्देमालासह पोलिसांच्या स्वाधीन केले होते. वाहिनीवाले तिथे पोहचले होते.
"हो..हो... मी बबन. डॉ. अजय गुंडे साहेबांकडे काम करतो. आज सकाळीच साहेबांनी एका मुलीचा गर्भपात केला. तो... हाच तो गर्भ. नाही. नाही. त्या पोरीचा पत्ता, नाव मला माहिती नाही हो... गर्भपात होताच ते बाळ असे बांधून शहराबाहेरच्या नदीत टाकण्याचे काम माझे असते. आठवत नाही हो पण चार-पाचशे असे पार्सल.. नोकरी म्हणल्यावर सारीच कामे करावी लागतात..."
'बाप रे! आता मेलो. काही खैर नाही. गणपत, तुझ्यावरही माझा खूप विश्वास होता रे. पण तूही खरे खरे बोलून मोकळे झालास. दुसऱ्या शब्दात तूही मला फसवलेस की. तुला तरी का दोष देऊ? जिथे माझ्या पोटच्या पोरीने मला दगा दिला तिथे तू तर कितीही झाला तरी परकाच की. आता सामाजिक संघटना, महिला मंडळे, वाहिनीवाले गिधाडासारखे धावून येतील. त्यांचे तरी काय चुकणार? त्यांच्या हाती घबाडच सापडले आहे. पोलीसही येतील. अटक होण्यापूर्वीच मला पोबारा करायला हवा. पण या परिस्थितीत, सारे काही समोर स्वच्छ दिसत असताना कोण मला मदत करणार? आता जिवलावे असतील, आगलावे असोत कुणी- कुणी मला आधार देणार नाही. इतर कुणाचीही मदत मिळणे शक्यच नाही. सारे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट असताना कोण स्वतःचे पद, प्रतिष्ठा धोक्यात घालणार आहे? चला आता....' असे स्वतःशीच बडबडत मनातल्या मनात एक निर्णय घेत डॉ. अजय गुंडेंनी पलंग सोडला. गादीखालची रिव्हॉल्वर घेत असताना दारावर एकामागून एक थापा पडू लागल्या. पाठोपाठ सहाय्यक डॉक्टरचा आवाज आला,
"साहेब, उठा लवकर चला. भयंकर घडलंय. छाया बेशुध्द झालीय. हालचाल करीत नाही. नाडी लागत नाही. बी.पी. डाऊन आहे. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झालाय..."
'काय? छायाची अशी अवस्था ? का झाले असे? सकाळपासून अस्वस्थ होतो त्यामुळे तर काही चूक झाली नाही ना? पण आता मला छायाजवळ जाताही येणार नाही. कदाचित तिचा जीव माझे सहकारी वाचवतील....' डॉ. अजय स्वतःशीच बोलत असताना पुन्हा दुसऱ्या सहाय्यकाचा धाप लागल्यागत आवाज आला,
"साहेब, दार उघडा हो. छाया सिरीयस आहे हो. साहेब, कदाचित ती... तिचा जीव गेला..."
'ना... ही.. असे होऊ शकत नाही. माझी छाया...' असे जोराने ओरडत डॉ. अजय गुंडेंनी हातातल्या पिस्तुलाचा खटका दाबताच त्यातून सुटलेली गोळी त्यांच्या चाळ्यातून आरपार गेली...
००००
*समाप्त*

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED