जैसे ज्याचे कर्म - 6

  • 7.9k
  • 3.1k

जैसे ज्याचे कर्म! (भाग ६) आगलावे यांनी महत्त्वाच्या कामासाठी फोन केला असेल हे ओळखून डॉ. गुंडे यांनी समोर बसलेल्या पेशंटला आणि नर्सला बाहेर बसायला सांगून म्हणाले, "बोला आगलावे साहेब, बोला. आज कशी काय आठवण झाली?" "काय करता गुंडेसाहेब, कामच तसे महत्त्वाचे आहे म्हणूनच तुमची आठवण आली..." "बोला ना बोला. फोनवर तुमचे नाव पाहिले आणि सर्वांना बाहेर बसायला सांगितले. सध्या मी एकटाच आहे. सांगा. कुणाचे अबॉर्शन..." "दुसरे काय असणार? पण फोनवर नाही बोलता येणार. तातडीने भेटायला येऊ शकाल का?" "तातडीने? अहो, पण..." "गुंडे,