जैसे ज्याचे कर्म! (भाग ९) असेच दिवस जात होते. केवळ डॉ. गुंडे यांच्या शहरातच नव्हे तर राज्यातील अनेक शहरातील दवाखान्यांमधून 'नको असलेले मुलीचे गर्भ' काढून टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले होते. नवविवाहित तरुणीला गर्भ राहताच अनेक कुटुंबातून 'गर्भलिंगनिदान' करण्याचा प्रकार वाढत होता. या चाचणीतून गर्भाशयात नुकताच फुलू लागलेला गर्भ मुलीचा आहे असे समोर येताच तो गर्भ पाडून टाकण्याकडेही अनेक कुटुंबीयांचा कल वाढत होता. विशेष म्हणजे 'तसा' आग्रह धरण्यात ती तरुणीच पुढे असायची. दिवसेंदिवस गर्भलिंगनिदान आणि गर्भपात ह्या प्रक्रिया वाढत