आकर्षण

  • 7.6k
  • 2.2k

आकर्षणाची गम्मतच वेगळी आहे .माझ्या मते तर या आकर्षणामुळे खरं तर माणसाला जगण्याची आस राहते.एखाद्या गोष्टीविषयी जर आपल्याला आकर्षण असेल तर ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण काहीही करू शकतो आणि जर त्या गोष्टीचं आकर्षण कालांतराने संपलं तर ती गोष्ट आपल्याला तितकीच नकोशी असते... अशाच माझ्या एका आकर्षणाची गोष्ट जी आयुष्यभर माझ्या लक्षात राहील...मी एका छोट्याशा गावातली गावंढळ मुलगी पण मला माझं गाव अजिबात आवडत नव्हतं मी लहानपणी कधीतरी आमच्या दूरच्या नातेवाईकांकडे राहायला गेले होते तेव्हापासूनच शहराची ओढ लागलेली तिथली श्रीमंती, तिथे रस्त्यावर नटून सजून जाणाऱ्या लोकांची गर्दी त्यांची सगळी जीवनशैलीच मला फार पटायची .ज्या गोष्टी गावाकडे फार फार कष्ट करून मिळायच्या