ट्रेन ची अनाउन्समेंट झाली असते. ट्रेन पुणे स्टेशन वर थांबली असते. आपल सगळ सामान घेऊन ती खाली उतरते. या अगोदर ही ती पुण्यात आली होती.. कित्येक दा. पण आज तिला पुणे काहीतरी वेगळे भासत असत.. टॅक्सी ड्रायव्हर ला पत्ता सांगून ती तिच्या मार्गाने निघते. काही मिनिटात त्या पत्त्यावर पोहोचते. दिक्षित वाडा ... भल्यामोठ्या शोभित भिंतीवर आकर्षित अशी नेमप्लेट वाचून वाड्याच्या गेट कडे ती वळते. गेट च्या आत मध्ये जात असतानाच तिला गेटवर वॉचमन अडवतो. "अहो कुठे जात आहात न विचारता. हे पर्यटक स्थळ नाही आहे परवानगी न घेता आत यायला. दिक्षित वाडा आहे हा." - वॉचमन त्याच्या अश्या बोलण्याने तिला