किती सांगायचंय तुला - ५

  • 10.9k
  • 4.1k

रात्रभर विचार करत होती दिप्ती.. शिवा सोबत तिची झालेली अनपेक्षित मैत्री तिला तिच्या भूतकाळात घेऊन आली होती. किती तरी आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या. सगळ किती अचानकपणे झालं होत, तिला नव्हत पडायचं पुन्हा या सगळ्यात. पण म्हणतात ना काळापुढे कुणाचं काही चालत नाही तसे दिप्ती च झालं असते.. रात्री विचार करता करता तिला बाल्कनीत च झोप लागली असते आणि जाग येते ती अलार्म वाजतो तेव्हा.. अलार्म च्या आवाजाने ती उठली तर होती पण मन मात्र काल झालेल्या प्रसंगात अडकून होत. किती तरी वेळ ती तशीच सोफ्यावर बसून राहते. पण विचार करून काही फायदा नाही म्हणून मन नसतानाही आपल डेली रूटीन