किती सांगायचंय तुला - ७

  • 12.1k
  • 3.7k

दिप्ती रूम मध्ये येऊन फ्रेश होते आणि लगेच झोपी जाते. शिवा मात्र अजूनही जागाच असतो. त्याला कॉफी शॉप मधला प्रसंग आठवतो.. "जर आज ती कॉफी त्यांनी प्यायली असती तर मला कळल असत माझी मैत्री स्वीकार केली की नाही ते. पण त्या बावळट मुलाने घोळ केला सगळा.."- शिवा चिडून म्हणतो.. त्याला राग येत असतो त्या मुलाचा.. मुड ठीक करण्यासाठी मोबाईल वर गाणी ऐकावी म्हणून तो मोबाईल घेतो तर त्याला आठवत की त्याने दिप्ती च्या नकळत तीच गाण मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं होत. तो ती रेकॉर्डिंग लावतो आणि कार मधला प्रसंग डोळ्यासमोर आणत झोपी जातो.. तीन चार दिवस दिप्ती आणि शिवा कामात