किती सांगायचंय तुला - १०

(22)
  • 14.2k
  • 3
  • 4.7k

कामामध्ये शिवा आणि दिप्ती दोघांचेही चार पाच दिवस असेच निघून जातात. बाप्पा पण त्यांच्या गावाला परतले असतात. एवढ्या दिवसात दिप्ती आणि शिवाची मैत्री आणखीच घट्ट झाली होती. दिप्ती ला तर कळले नाही हे पंधरा दिवस कसे भराभर निघून गेले ते. तीच काम पण पूर्ण झालं होत. पण सयाजी रावांना वचन दिल्यामुळे तिला श्रुती ने सयाजीराव साताऱ्याहून परत येई पर्यंत थांबवून ठेवलं होतं. एवढ्या दिवसांपासून शिवा टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता आज तो दिवस उजाडला. आजचा दिवस शिवासाठी खूप महत्त्वाचा होता. एवढ्या दिवसांच्या मेहनतीचं फळ त्याला आज मिळणार होत, जर ती डील त्याला मिळाली तर. कारण तो एकटा त्यासाठी मेहनत करत