काशी - 2

  • 9.2k
  • 3.8k

प्रकरण २ ज्ञानूच्या बापूचे मयत झाल्यावर ज्ञानूची माय आणि ज्ञानू लाकडे तोडायला जात असे आणि मी माझ्या माय बरोबर आपल्या डोक्यावर छोटीशी चुंबळ ठेवून त्यावर दगडी खल ठेवून विकायला जात असे. संध्याकाळी मात्र आम्ही झोपड्पट्टीची सर्व मुले एकत्र येऊन खेळ खेळत असत . दिवसभर उन्हा-तान्हाचं वण-वण फिरून पाय खूप दुखायचे. तेव्हा माय आमचे पाय दाबून देत असे. आता मात्र ज्ञानूची आणि माय-बापूची लई आठवण येति---आता ते जिवंत सुद्धा नसतील.---- अशा आठवणी काढून आजी मधेच रडत होती तर मधेच सुखावत होती. बरं चल आता जास्त विचार करू नको, आता आराम कर--- असे म्हणून सर उठून नर्स