Shobhana N. Karanth लिखित कादंबरी काशी | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी काशी - कादंबरी कादंबरी काशी - कादंबरी Shobhana N. Karanth द्वारा मराठी सामाजिक कथा (18) 5.2k 10.9k 1 रात्रीची वेळ होती. सतीश सर, मनोज, राम आणि राजू ड्राइव्हर असे चौघे जण गाडीने आश्रम कडे परतीचा प्रवास करत होते. सतीश सर म्हणजे काशी आश्रमाचे संस्थापक आणि बाकी जण हे त्यांचे सहकारी, रस्त्यावरील अनाथ मुले व वृद्ध यांना शोधून ...अजून वाचाआश्रम मध्ये आश्रय देण्यासाठी रोजच्याप्रमाणे बाहेर पडलेले होते. परताना खूप रात्र झालेली होती. अचानक सर म्हणाले " राजू जरा गाडी साईडला घे. तिथे अंधारात कोणीतरी बसलेलं दिसत आहे ---" सरांच्या म्हणण्याप्रमाणे राजुने गाडी रस्त्याच्या एका साईडला घेतली. पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी काशी - 1 1.4k 2.5k प्रकरण १ रात्रीची वेळ होती. सतीश सर, मनोज, राम आणि राजू ड्राइव्हर असे चौघे जण गाडीने आश्रम कडे परतीचा प्रवास करत होते. सतीश सर म्हणजे काशी आश्रमाचे संस्थापक आणि बाकी जण हे त्यांचे सहकारी, रस्त्यावरील अनाथ मुले व ...अजून वाचायांना शोधून त्यांना आश्रम मध्ये आश्रय देण्यासाठी रोजच्याप्रमाणे बाहेर पडलेले होते. परताना खूप रात्र झालेली होती. अचानक सर म्हणाले राजू जरा गाडी साईडला घे. तिथे अंधारात कोणीतरी बसलेलं दिसत आहे --- सरांच्या म्हणण्याप्रमाणे राजुने गाडी रस्त्याच्या एका साईडला घेतली. मनोज, राम, राजू व सर त्या बसलेल्या व्यक्तीकडे गेले. चादर गुंडाळून एक म्हातारी बसलेली होती. सरांकडे बघून ऐका आता वाचा काशी - 2 675 1.2k प्रकरण २ ज्ञानूच्या बापूचे मयत झाल्यावर ज्ञानूची माय आणि ज्ञानू लाकडे तोडायला जात असे आणि मी माझ्या माय बरोबर आपल्या डोक्यावर छोटीशी चुंबळ ठेवून त्यावर दगडी खल ठेवून विकायला जात असे. संध्याकाळी मात्र आम्ही झोपड्पट्टीची सर्व मुले ...अजून वाचायेऊन खेळ खेळत असत . दिवसभर उन्हा-तान्हाचं वण-वण फिरून पाय खूप दुखायचे. तेव्हा माय आमचे पाय दाबून देत असे. आता मात्र ज्ञानूची आणि माय-बापूची लई आठवण येति---आता ते जिवंत सुद्धा नसतील.---- अशा आठवणी काढून आजी मधेच रडत होती तर मधेच सुखावत होती. बरं चल आता जास्त विचार करू नको, आता आराम कर--- असे म्हणून सर उठून नर्स ऐका आता वाचा काशी - 3 543 1k प्रकरण ३ जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी ज्ञानूला, माय-बापूला आवाज देऊ लागले. मी कुठे आले आहे हे मला उमगत नव्हते. एका मऊ मऊ गादीवर मी झोपले होते. बाजूला पाच-सहा नटलेल्या बाया होत्या. परंतु त्यात मला घेऊन येणारी बाय ...अजून वाचाज्ञानू दिसत नाही म्हणून मी पुन्हा जोराने रडू लागले. तेवढ्यात एक जाडी अम्मा आली. तिने मला जवळ घेतले आणि मला कुरवाळू लागली. नंतर मला तिने दूध-बिस्कीट खायला दिले. मला मायची खूप आठवण येऊ लागली. म्हणून मी तिच्या कुशीत शिरून माय-माय म्हणून रडू लागली. बेटा रोना नहीं--'तेरी माय नहीं तो क्या हुआ---मैं 'तेरी माय जैसी हूं ना---तू घाबरू नकोस---आता तू ऐका आता वाचा काशी - 4 465 987 प्रकरण ४ सर नानांशी गप्पा मारून आजीलाही भेटून आपल्या रूमवर आले. मन फ्रेश करण्यासाठी सरांनी वाचायला पेपर हातात घेतला. सर पेपर चाळत होते परंतु मन दुसऱ्याच विचाराकडे धावत होते. ज्या काशीसाठी मी स्वतःला अविवाहित ठेवले. तिला सुख मिळावे म्हणून ...अजून वाचाजागो जागी शोध घेत राहिलो. तिच्या नावाने असा काशी आश्रम स्थापन केला कि त्यामध्ये काशी आणि ज्ञानू सारखे निराश्रित मुलं व वृद्ध यांना आसरा मिळू शकेल. आज कित्येक गरिबीच्या कारणाने लहान मुलं शिक्षण सोडून पैसे कमाईच्या पाठी आहेत. जे वय शाळा शिकून आपले भवितव्य बनवायचे आहे त्या वयात दारूच्या गुत्यावर दारू बनविण्याचे काम करत आहेत. कोणी समुद्र किनारी मासळी वेगळी ऐका आता वाचा काशी - 5 408 1.1k प्रकरण ५ सर आपल्या काशी विषयी विचार करत होते. तेवढ्यात राजू आला. सर, आपल्याला कधी निघायचे आहे---? म्हणजे त्याप्रमाणे गाडी काढायला--- आपण जेवलो कि लगेच निघूया---तू जाऊन रामला व मनोजला तसे सांगून ये--- ...अजून वाचासर म्हणाले. तरीसुद्धा राजू तिथेच घुटमळत राहिला होता हे बघून सरांनी विचारले राजू तुला काही विचारायचे आहे कां---सरांनी शांतपणे विचारले. स--र-- राजू जरा संकोच करूनच बोलायचा प्रयत्न करत होता. अरे राजू---तुला काय बोलायचे आहे ते निसंकोच बोल---माझ्याजवळ तुला कसली भीती---? मी कधी कोणावर रागावतो कां---? सर हसत हसत म्हणाले. सर, हल्ली तुम्ही कुठल्यातरी विचारात असल्यासारखे वाटतात. परंतु तितकेच आनंदी ऐका आता वाचा काशी - 6 438 990 प्रकरण ६ दुसऱ्या दिवशी सर आणि राम व मनोज चंदू व लक्ष्मीला आणायला निघाले. चंदू व लक्ष्मी तयार होऊन नाक्यावर उभे राहून सरांची वाटच बघत उभे होते. त्यांच्या बरोबर त्यांचे बाजूला राहणारे वयस्कर चाचा सुद्धा उभे होते. ...अजून वाचाराजुने गाडी साईडला घेतली. सर गाडीबाहेर उतरताच त्यांच्या चाचाने सरांचे पाय धरले. अरेरे---हे काय करता---? तुमचे लई उपकार हायेत साब---या मुलांचे माय-बाप देवाघरी गेले---मी तर त्यांच्या बाजूला राहतो.या मुलांना बघून लई जीव कासावीस व्हतो---मी किती दिवस या मुलांना बघणार---?मी आज आहे तर उद्या नाही. एकदा मी माझ्या डोळ्याने बघीन कि हि लेकरं सुरक्षित हायेत तवा माझे ऐका आता वाचा काशी - 7 339 756 प्रकरण ७ सरांना राजुने जेवण आणून दिले. जेवण करून सरांनी आश्रमाचा हिशोबाचा आढावा घेण्यास रजिस्टर हातात घेतले. परंतु मन हे भूतकाळातील घटनांकडे वेढू लागले होते. हळू हळू आठवणींचा वेढा मनाला जास्तच घट्ट घट्ट होऊ लागला. ते उठले आणि ...अजून वाचाकपाटातून काशीच्या गळ्यातील तुटलेला आणि चिखलात पडलेला ताईत काढून त्याकडे एक टक बघत राहिले. अजूनही त्या ताईत वरचा चिखल सुकला असला तरी त्यातील आठवणी या ओल्या होत्या. काशीला तो चिखलात पडलेला ताईत नको होता. म्हणून मी माझ्या गळ्यातील ताईत तिच्या गळ्यात घालून तिचा ताईत मी माझ्या खिशात ठेवून दिला होता. त्याला काशीची आठवण म्हणून मी आजवर जपून ठेवला. आज मी ऐका आता वाचा काशी - 8 303 750 प्रकरण ८ माझे शिक्षण होतं होते. वारंवार मनातून त्या पेपर विक्रेत्याचे आभार मानत होतो. वय लहान असले तरी अनुभवाने मला समज फार आली होती. माझे तर जीवन सुरळीत झाले होते. परंतु रात्री झोपतेवेळी काशीची खूप आठवण येत होती. ...अजून वाचाकुठे असेल---काय करत असेल---? तिला कोणी चांगली लोकं भेटली असतील कां---? या विचाराने कधी कधी झोपही येत नसे. मला चांगली नवीन माणसं भेटली होती. नवीन ओळखी, नवा परिसर, नवीन शाळकरी जीवन त्यामुळे मी एकीकडे आनंदीहि असे.खटकत होता तो म्हणजे माय-बापूचा दुरावा---त्यांची खूप आठवण यायची. परंतु मी कुठल्या गावी राहत होतो----माझ्या झोपडपट्टीचे नावही माहित नव्हते---यापासून मी एकदम अडाणी होतो. बघता बघता ऐका आता वाचा काशी - 9 288 711 प्रकरण ९ सर वयक्तिक भेट घेऊन प्रत्येकाची खुशाली विचारत होते.सर्व मुलं बागेत खेळत होती. परंतु चंदू व लक्ष्मी दोघे अभ्यास करत होते. हे बघून सरांना त्यांच्या विषयी कुतुहूल वाटले. त्या दोघांना बघून ज्ञानू व काशीची आठवण झाली.त्या ...अजून वाचाज्ञानू व काशीला बघू लागले. आज जर या दोघांना आसरा मिळाला नसता तर हि दोघे बिचारी बालमजुरी करून जीवन व्यतीत करत राहिले असते. लक्ष्मीला कोणी पळवून कोठीवर विकले असते.तर चंदू कुठे पाठीला पोक येईपर्यंत, हाताची नखं रक्तबंबाळ होईपर्यंत तर कुठे अंगावर उकळते तेल उडून अंगावर व्रण उठे पर्यंत बारा बारा तास काम करत राहिला असता---या विचारानेच सरांच्या अंगावर भीतीचे रोमांच ऐका आता वाचा काशी - 10 - अंतिम भाग 315 942 प्रकरण १० सकाळ पासून आजीची तब्येत नाजूकच वाटत होती. खोकल्याची उबळ आली कि थांबतच नव्हती. त्यामुळे तिला श्वास घ्यायलाहि फार जड वाटत होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ऑक्सिजनवर ठेवले होते. आजी डोळे उघडून कोणाच्या तरी प्रतीक्षेत होती असे तिच्या चेहेऱ्यावरच्या ...अजून वाचावाटत होते. म्हणून नर्सने फोन करून सरांना बोलावून घेतले. सर येताच तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसली. " आर तू असलास कि मला खूप धीर आल्यासारखा वाटतो. तू माझ्या बाजूलाच बसून राहा---माझं लक्षण काही ठीक दिसत नाही तरी सुद्धा ज्ञानूला पाहिल्या शिवाय मी डोळे मिटणार नाही---" हे ऐकून नर्स म्हणाली " सर, हा ज्ञानू यांचा मुलगा आहे कां---त्यांचा सगळा जीव त्यांच्या ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Shobhana N. Karanth फॉलो करा