Kashi - 8 books and stories free download online pdf in Marathi

काशी - 8

प्रकरण ८

  माझे शिक्षण होतं होते. वारंवार  मनातून त्या पेपर विक्रेत्याचे आभार मानत होतो. वय लहान असले तरी अनुभवाने मला समज फार आली होती. माझे तर जीवन सुरळीत झाले होते. परंतु रात्री झोपतेवेळी काशीची खूप आठवण येत होती. काशी कुठे असेल---काय करत असेल---? तिला कोणी चांगली लोकं भेटली असतील कां---? या विचाराने कधी कधी झोपही येत नसे.

 मला चांगली नवीन माणसं भेटली होती. नवीन ओळखी, नवा परिसर, नवीन शाळकरी जीवन त्यामुळे मी एकीकडे आनंदीहि असे.खटकत होता तो  म्हणजे माय-बापूचा दुरावा---त्यांची खूप आठवण यायची. परंतु मी कुठल्या गावी राहत होतो----माझ्या झोपडपट्टीचे नावही माहित नव्हते---यापासून मी एकदम अडाणी होतो. 

 बघता बघता मी चांगला शिकून ग्रॅज्युएट झालो. ग्रॅज्युएट नंतर मी स्वतः नोकरी करून पुढील सीए चे शिक्षण घेऊन बँकेत एक मॅनेजर म्हणून कामाला लागलो. हळू हळू अनुभवाने काही वर्षाने एक वाईस प्रेसिडेंट म्हणून उच्च पदाला माझी नेमणूक झाली. आश्रम मध्ये माझा मोठा सत्कार झाला. परंतु हे सर्व काही निरस निरस वाटतं होते. मनातून कशाचीतरी कमी भासत होती. काशी माझ्या मनातून विसरली जात नव्हती. माय-बापूंच्या आशीर्वादाची कमी जाणवत होती. कधी कधी मन भरकटून जात होते. हे सर्व कोणासाठी करायचे---? कोणासाठी कमवायचे---? ना आपल्यासाठी कोणी रडणारे---ना कोणी आपली वाट पाहणारे--- मन अगदी उदास होऊन जायचे.

 एक दिवस आश्रमातील एका दीदीने विचारले " संतोष, तू आश्रमात आला तेव्हा तू कसा होता आणि आता तू कोण आहेस---या गोष्टीचा तुला आनंद वाटतं नाही कां---? तू नेहमी उदास उदास दिसतो---तुझ्या मनात जे काही असेल ते तू मला मोकळेपणाने सांग---म्हणजे तुला तुझे मन हलके होईल---" 

 दीदींच्या सांगण्यावरून मी माझ्या जीवनाविषयी सर्वकाही सांगून मी माझे मन हलके केले. मलाही त्यावेळी खूप बरे वाटले. 

    " हे बघ संतोष, या आश्रमने तुला खूप काही शिकवले. संस्कार दिले. त्या संस्काराच्या आधारे तू तुझे ज्ञान, तुझा पैसा सत्कार्यासाठी लाव---तेव्हाच तुला या आश्रमाच्या मोलाची परतफेड केल्याचे समाधान होईल---तुझ्यासारखी मुले आज या दुनियेत कित्येक आहेत. त्यांचे जीवन आज रस्त्यावर मोलमजुरी करून संपून जात आहे. त्यांच्यासाठी तू तुझे ज्ञान उपयोगात आण. तुझ्याप्रमाणे त्यांचे भविष्य उज्वल करण्यात त्या पैशाचा सदुपयोग कर---त्यांच्या मिळालेल्या दुवाने तुझ्या आजपर्यंतच्या कष्टाचे चीज होईल आणि बघ एक दिवस तुला तुझी काशी परत मिळेल---तुला खरे जीवन जगण्याचे समाधान मिळेल---"

 दीदींच्या त्या प्रेरणात्मक शब्दांनी मला जणू स्फूर्ती आली. त्या स्फूर्तीतूनच माझी पायवाट त्या दिशेने चालू लागली आणि काही वर्षांनी या " काशी आश्रमाची  " स्थापना झाली---" 

 अचानक विचारांच्या गतीला विराम मिळताच संतोष सर उठून हातातील ताईत पुन्हा कपाटात ठेऊन दिला. घड्याळात बघितले तर संध्याकाळचे पाच कधी वाजले समजलेच नाही. हिशोबाचे रजिस्टर बाजूला ठेऊन सर फ्रेश होण्यास गेले.    

  संध्याकाळचे बहुतेक वृद्ध बागेत फिरायला गेले होते.तर मुलं आपल्या खेळात गुंग होते. राम, राजू व मनोज बागेतील झाडांची पाहणी करत होते. आजीला भेटून यावे या विचाराने सरांचे पाय काशीकडे वळले. आजी निवांत बसली होती. 

 " काय आजी आज तब्येत कशी आहे---? " 

 " माझं काय एक दिवस बरी तर एक दिवस आजारी---"

 " चल, व्हिलचेअर  वरून फिरायला येतेस कां---?  जरा मोकळ्या हवेवर बरं वाटेल तुला---"

 " नगं, हवेवर गेलं कि वारं लागतं तर खोकला वाढतो---"

 " बरं बरं तू इथेच बस---औषध वगैरे बरोबर घेतेस नं---? "

   तेवढ्यात समोरून नर्स आजीजवळ आली आणि सरांना म्हणाली " सर, काल रात्री आजी झोपेतच शेवंता बाय म्हणून ओरडत होती. तेव्हा मी तिला जागे करून विचारले तर आजी म्हणते कि " मला काय माहित नाय---" आजी असेच कोणाचे नं कोणाचे नाव घेत असते. एक दिवस ज्ञानू---ज्ञानू म्हणून ओरडत होती. तर कधी कधी इकडे तिकडे टकामका बघत जागीच्या जागी असते. मग मी तिला इंजेक्शन देऊन झोपवते. परंतु रोज रोज इंजेक्शन देता येत नाही---"

 " तिचा खोकला आता कसा आहे---? " सरांनी विचारले.

 " खोकला आता तसा कमी झाला आहे---" असे म्हणून नर्स निघून गेली.

 " आजी जास्त विचार करू नको---बरं व्हायचे आहे नं---ज्ञानूला बघायचे आहे नं---? चल, आता तू आराम कर---मी जरा सर्वांना भेटून येतो---" असे म्हणून सर निघून गेले. 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED