काशी - 3

  • 8.7k
  • 3.7k

प्रकरण ३ जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी ज्ञानूला, माय-बापूला आवाज देऊ लागले. मी कुठे आले आहे हे मला उमगत नव्हते. एका मऊ मऊ गादीवर मी झोपले होते. बाजूला पाच-सहा नटलेल्या बाया होत्या. परंतु त्यात मला घेऊन येणारी बाय नव्हती. ज्ञानू दिसत नाही म्हणून मी पुन्हा जोराने रडू लागले. तेवढ्यात एक जाडी अम्मा आली. तिने मला जवळ घेतले आणि मला कुरवाळू लागली. नंतर मला तिने दूध-बिस्कीट खायला दिले. मला मायची खूप आठवण येऊ लागली. म्हणून मी तिच्या कुशीत शिरून माय-माय म्हणून रडू लागली. बेटा रोना नहीं--'तेरी माय नहीं तो क्या हुआ---मैं 'तेरी माय जैसी हूं ना---तू घाबरू नकोस---आता तू