काशी - 4

  • 8.8k
  • 3.3k

प्रकरण ४ सर नानांशी गप्पा मारून आजीलाही भेटून आपल्या रूमवर आले. मन फ्रेश करण्यासाठी सरांनी वाचायला पेपर हातात घेतला. सर पेपर चाळत होते परंतु मन दुसऱ्याच विचाराकडे धावत होते. ज्या काशीसाठी मी स्वतःला अविवाहित ठेवले. तिला सुख मिळावे म्हणून तिचा जागो जागी शोध घेत राहिलो. तिच्या नावाने असा काशी आश्रम स्थापन केला कि त्यामध्ये काशी आणि ज्ञानू सारखे निराश्रित मुलं व वृद्ध यांना आसरा मिळू शकेल. आज कित्येक गरिबीच्या कारणाने लहान मुलं शिक्षण सोडून पैसे कमाईच्या पाठी आहेत. जे वय शाळा शिकून आपले भवितव्य बनवायचे आहे त्या वयात दारूच्या गुत्यावर दारू बनविण्याचे काम करत आहेत. कोणी समुद्र किनारी मासळी वेगळी