काशी - 5

  • 8.3k
  • 3.5k

प्रकरण ५ सर आपल्या काशी विषयी विचार करत होते. तेवढ्यात राजू आला. सर, आपल्याला कधी निघायचे आहे---? म्हणजे त्याप्रमाणे गाडी काढायला--- आपण जेवलो कि लगेच निघूया---तू जाऊन रामला व मनोजला तसे सांगून ये--- सर म्हणाले. तरीसुद्धा राजू तिथेच घुटमळत राहिला होता हे बघून सरांनी विचारले राजू तुला काही विचारायचे आहे कां---सरांनी शांतपणे विचारले. स--र-- राजू जरा संकोच करूनच बोलायचा प्रयत्न करत होता. अरे राजू---तुला काय बोलायचे आहे ते निसंकोच बोल---माझ्याजवळ तुला कसली भीती---? मी कधी कोणावर रागावतो कां---? सर हसत हसत म्हणाले. सर, हल्ली तुम्ही कुठल्यातरी विचारात असल्यासारखे वाटतात. परंतु तितकेच आनंदी