वृद्धाश्रमातलं प्रेम - 1

  • 11k
  • 5k

The Love story in Second Innings..... भाग – १ “हो, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही या रविवारी आणि रविवारी नाही जमलं तर सोमवारी या. आठवड्याचे सर्व दिवस आम्ही हजर असतो. त्यामुळे निश्चिंत रहा.” नेटवर्क प्रॉब्लेम असल्याने ‘निवारा’ वृद्धाश्रमाचे मॅनेजर बाहेर पटांगणात येऊन बोलत होते. ‘निवारा ओल्ड केयर’ हा मुंबई-पुणे हाय वे च्या मध्ये कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात उभारलेला वृद्धाश्रम होता. भलेमोठे पटांगण, समोर ऑफिस, ऑफिसच्या एका बाजूला किचन, वाचनालय वगैरे होते आणि दुसर्‍या बाजूला कॉमन हॉल. तिथं टीव्ही वगैरे होता, पण आयुष्याच रस्ता असा संपत आलेला असताना यांच कशात मन लागणार होतं? असो, शिवाय ऑफिसवर वृद्ध कपल्स साठी सोय, पटांगणाच्या एका बाजूला