वृद्धाश्रमातलं प्रेम - 5

  • 6.7k
  • 2.6k

भाग – ५ “आपण दोघं मिळून शोधूयात का?” तिने मला असं विचारलं तेव्हा मी जास्तच घाबरलो. तिथं आमच्या गावाचा एक मुलगा शेवटच्या वर्षाला होता. त्याने जर पाहिल्याच दिवशी मला मुलीसोबत पाहिलं असतं तर मला घरात काय गावातसुद्धा घेतलं नसतं. मी त्या आपत्तीचं चिंतन करत होतो आणि पहिलाच दिवस असल्याने उशिरा जाणंसुद्धा योग्य नव्हतं. मी द्विधा मनःस्थितीत होतो. मला असं बघून तीच म्हणाली, चला, लवकर वर्ग शोधूयात नाहीतर पाहिल्याच दिवशी बॅड इंप्रेशन पडेल. मी तिच्या मागोमाग जाऊ लागलो. ती बिनधास्तपणे रस्त्यात दिसणार्‍या कुणालाही वर्ग विचारू लागली. मागे वळून मला म्हणाली, “चला लवकर. कुठे हरवलात?” आम्ही आता सोबतच चालू लागलो. मला ते