दुभंगून जाता जाता... - 1

  • 8k
  • 4k

लेखक परशुराम माळी 1 ( दुभंगून जाता जाता... या कादंबरीतील वस्तू, घटना, पात्रे, प्रसंग, ठिकाण काल्पनिक असून, त्यांचा वास्तवाशी ( सजीव – निर्जीव ) तिळमात्र संबंध नाही. संबंध आढळून आल्यास तो केवळ योगायोग समजावा. ) आई जग सोडून गेली त्यावेळी माझं वय न कळण्याचं होतं... आई गेली तशी काही दिवसांतच बाबाही गेले. कारण आजारपणाचं असंल तरी खरं कारण काही वेगळंच होतं. ते मला मी मोठं होईल तसं समजत गेलं... मी थोडं मोठं झाल्यावर म्हणजे मला थोडं कळायला लागल्यावर ज्यांच्या घरात आम्ही भाड्याने राहत होतो तेथे जाऊन मी विष्णू मामांकडून सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला... बोरगावच्या बस स्थानकावर उतरलो... विष्णूमामाचं हॉटेल