मसनवाडी

(14)
  • 14.5k
  • 5
  • 4.4k

९४ सालच्या मे महिन्यातली ही गोष्ट. मला अजूनही व्यवस्थित आठवतय. मुंबईवरून सकाळी ७ वाजता मी नंदुरबारची एसटी पकडली. एसटी नंदुरबारला पोहोचायला संध्याकाळचे ६ वाजणार होते. जवळपास १० - ११ तास एसटीत बसायचं म्हणजे मला आताच अवघडल्यासारखं वाटत होतं. एसटी लागल्या लागल्या फटकन चढून खिडकीशेजारची जागा पकडून बसलो खरा पण एस टी सुरू व्हायलाच एक तास गेला. इंजिनमध्ये कसलातरी बिघाड झाला होता . तो दुरुस्त करून एसटी निघू पर्यंत ८ वाजून गेले. तेवढ्या वेळात मी संपूर्ण वर्तमानपत्र चाळून काढलं. त्यानंतर खिडकीतून बाहेर बघ, इकडं बघ तिकडं बघ असं करण्यात वेळ गेला. प्रवास सुरु होऊन अजून एक तास पण नव्हता झाला