जैसे ज्याचे कर्म - 10 - अंतिम भाग

  • 9.7k
  • 3.4k

जैसे ज्याचे कर्म! (भाग १०) सायंकाळचे सहा वाजत होते. डॉ. मुंडे हे त्यांच्या दवाखान्यात जाण्यासाठी तयार होत होते. परंतु त्यांना पुन्हा नैराश्याने घेरले. निशाचा गर्भपात केल्यापासून त्यांची अस्वस्थता, तळमळ, तगमग कमी होत नव्हती. स्वतःची झालेली तशी स्थिती ती कुणाला सांगूही शकत नव्हते.सांगणार कुणाला तर पत्नीला! परंतु एकतर तिला वेळच नव्हता आणि ज्या ज्या वेळी नवऱ्याने छायाबद्दल तिच्याजवळ विषय काढला त्या प्रत्येकवेळी बायकोने त्यांनाच दरडावले. वास्तविक पाहता निशा प्रकरणानंतर छायाच्या बाबापेक्षा तिच्या आईने जास्त सावध व्हायला हवे होते. छायाला विश्वासात घेऊन हे