ती रात्र - 3

  • 23.2k
  • 13.2k

त्या रात्री तिने मला प्रपोज केलं, मी तिला हो सुध्दा म्हणालो होतो. थोडा वेळ आम्ही अजुन फोन वर बोललो, मला झोप मात्र लागत नव्हती. काय केलं मी , मला काहीच समजत नव्हतं. डोक्यात वेगळेच विचार सुरू होते, हे प्रेम आहे की आकर्षण या दोघांमध्ये द्वंद्व सुरू होते. कारण आम्हाला भेटून फारसे काही दिवस झाले नव्हते, पण इतक्या कमी वेळात कुणी कसं काय प्रेमात पडेल. प्रेम व्हायला एक सेकंद पण कमीच असतो पण त्यासाठी खूप मोठा ओळखीचा, समजून घेण्याचा, काळजीचा इतिहास असतो. आमचा तसा काही इतिहास नाही.मी त्या रात्री खूप विचार केला, तिला हो तर म्हणालो पण आता मी हे कसं