ग्रंथालयात काही पुस्तकं घेण्यासाठी गेलो होतो. तिकडे मला आत गेल्यावर काही पुस्तकं खूप जास्त आवडली. तिथेच उभा राहून पुस्तकांची प्रस्तावना वाचत होतो. पुस्तकांचा सुवास काही औरच होता. मला कधी कुणी विचारलं ना की तुझं आवडत अत्तर किंवा परफ्यूम कुठलं तर नकळत माझ्या तोंडून ओल्या मातीचा आणि नवीन पुस्तकांचा बाहेर पडणार. त्याच सुवासात मग्न होऊन मी पुढे चालत चालत पुस्तकं बघत होतो. अचानक पुस्तकांचा सुवास कमी व्हायला लागला, त्याची जागा आता दुसऱ्या कशाने तरी घेतली होती. हळु हळु मी पुढे पुढे जात होतो आणि तो पुस्तकांचा सुगंध कमी होत चालला होता. अज्ञात आणि तितकाच आकर्षित करणार सुगंध तीव्र होत होता. मी