9 उतावळ्या स्वभावाच्या चंद्रनागास विचार करत बसणे शक्यच नव्हते. तो तडक गंगानगरी जाण्यास निघाला. अर्थात कोणालाही कसलीच कल्पना न देता. मोटरगाडी गंगानगरीजवळील एका खेड्यात ठेवून तिथून घोडा घेऊन, वेशांतर करून तो गंगानगरीस पोहोचला. या वेळेस तो अर्थातच राजमहाली जाणार नव्हता. तिथल्याच एका मुसाफिरखान्यात त्याने स्वत:साठी राहण्याची सोय पाहिली. मुसाफिरखान्यात मुद्दामच 'आपण हिऱ्यामोत्यांच्या दागिन्यांचा व्यापारी असून काही खास विलायती दागीने आपल्याजवळ आहेत. इथल्या राजकुमारीस ते आवडतील आणि आपल्यास चांगली किम्मत मिळेल या आशेने आपण आलो असल्याचे त्याने सर्वांना सांगितले.' माझी मुलगी राजकुमारीच्या सखीची सखी असून ती तुझी काही मदत करू शकेल असे मालकाने म्हणताच चंद्रनागास अत्यानंद झाला. मालकाच्या मुलीने त्या